सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मराठी चित्रपटात काम करण्यास उत्सुक आहेत. पिगी चॉप्स प्रियांका चोप्रा, शरद केळकर असे अनेक हिंदी कलाकार आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना दिसत आहेत. यांच्यासह आता सगळ्यांची लाडकी असलेली धकधक गर्ल माधुरी दीक्षित मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. लवकरच माधुरी एका मराठी चित्रपटाची निर्मिती करत असल्याचंही तिने जाहीर केलं आहे. '१५ ऑगस्ट' असं या मराठी चित्रपटाचं नावं आहे.
या चित्रपटात 'व्हेंटिलेटर' फेम राहुल पेठे आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपाटाच्या चित्रीकरणाची लवकरच सुरुवात होणार आहे. या चित्रपाटाचे लेखन योगेश जोशी यांनी केलं असून स्वप्नील जयकर हे दिग्दर्शन करणार आहेत. मात्र या चित्रपटात आपण कोणतीच भूमिका साकारत नसल्याचं खुद्द माधुरीने स्पष्ट केलं आहे. या चित्रपटात ती झळकणार नसली, तरी लवकरच तिचा 'बकेट लिस्ट' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
हेही वाचा
तेजश्री प्रधान झाली मराठीतली विद्या बालन!