मराठा समाजाने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी बुधवारी मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चा काढला. मराठा समाजातील लाखो बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मोर्चा मागे हटणार नाही आणि आझाद मैदानही सोडणार नाही असा निर्धार या मोर्चेकऱ्यांनी घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन देत मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या. या मागण्या मान्य झाल्याने मराठा समाजाने मोर्चाची सांगता केली.
मराठा मोर्चावरून ट्विटरवही विविध प्रतिक्रिया उमटल्या. सामान्यांसह राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही ट्विटरवर आपले मत मांडले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतरही मोर्चेकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. काही मोर्चेकऱ्यांनी थेट आमदार नितेश राणेंच्या गाडीसमोरच बैठक मारली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत नितेश राणेंची गाडी अडवून धरली. त्यामुळे अखेर नाईलाजाने नितेश राणेंना आंदोलकांसोबत पायीच विधानभवनाच्या दिशेने जावे लागले.
हेही वाचा -
मुंबईत मराठा मोर्चासाठी पोलिसांचा थ्री टायर बंदोबस्त!
पक्षांचे बॅनर फाडले, मोर्चात राजकारण्यांना 'नो एन्ट्री'