शिवसेना आमदार-खासदारांकडून केरळ पूरग्रस्तांना एका महिन्याचं वेतन

महाराष्ट्रातील शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपलं एक महिन्याचं वेतन देणार आहेत. हे वेतन केरळच्या मुख्यमंत्री मदत निधीत दिलं जाणार आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली.

केरळमध्ये महापूराने थैमान घातलं असून त्यात ३०० हून अधिक स्थानिकांचा मृत्यू झाला आहे. केरळसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू असताना शिवसेनेच्या सर्व आमदार आणि खासदार यांनी देखील आपलं एक महिन्याचं वेतन केरळच्या मुख्यमंत्री मदत निधीस देण्याचं ठरवलं आहे.

काय म्हणाले आदित्य?

शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदारांचं एका महिन्याचं वेतन केरळ मुख्यमंत्री मदत निधीस देण्यात येईल. त्याचबरोबर पक्षाच्या ठाणे विभागाने पूरग्रस्तांसाठी आवश्यक साहित्य आणि कपडे मागील आठवड्यात केरळला पाठवली आहे.

मदतीचं आवाहन

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्राचं २०१४ साली प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनातून जमा झालेल्या निधीतून केरळमधील पूरग्रस्तांसाठी आवश्यक साहित्य पाठवले जाणार असल्याचंही ते म्हणाले. त्याचबरोबर आदित्य यांनी आपल्या पक्ष सहकाऱ्यांना मदतीचं आवाहन केलं आहे. ज्यांना अन्न, कपडे, ब्लँकेट, औषधे देणे शक्य आहे, त्यांनी मदत करावी, असं अावाहन त्यांनी केलं आहे.


हेही वाचा-

महाराष्ट्रातील ६६ डॉक्टरांचं पथक केरळकडे रवाना

केरळमधील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून 35 टन मदतसामग्री


पुढील बातमी
इतर बातम्या