Advertisement

केरळमधील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून 35 टन मदतसामग्री

केरळातील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून 35 टन मदतसामग्री पाठवण्यात आली आहे. याशिवाय अन्नपुरवठा आणि इतर मदतीसामग्रीसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. तर समाजाच्या सर्व स्तरातील घटकांनी शक्य ती मदत करावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

केरळमधील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून 35 टन मदतसामग्री
SHARES

केरळमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून 35 टन मदतसामग्री पाठवण्यात आली आहे. याशिवाय अन्नपुरवठा आणि इतर मदतीसामग्रीसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. तर समाजाच्या सर्व स्तरातील घटकांनी शक्य ती मदत करावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.


 मदतसामग्री पाठवल्या

मुख्यमंत्र्यांनी 20 कोटींच्या आर्थिक मदतीची घोषणा यापूर्वीच केली होती. त्यानंतर अन्न, दूध पावडर, ब्लँकेट, बेडशीट्स, कपडे, साबण, सॅनिटरी नॅपकिन्स इत्यादी सामग्रीही केरळातील पूरग्रस्तांना पाठवण्यात आली आहे. तर केरळ सरकारने मागितलेल्या निकडीच्या बाबी यात प्राधान्याने पाठवण्यात येत आहेत.


नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यान्वित 

मदतकार्यासाठी एक नियंत्रण कक्ष मंत्रालयात चोवीस तास कार्यान्वित करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या व्यतिरिक्त एमसीएचआय-क्रेडाई, राजस्थान वेल्फेअर असोसिएशन, जितो इंटरनॅशनल, रिलायन्स रिटेल यांसारख्या विविध संस्था आणि संघटना या कामात सक्रीय योगदान देत आहेत. आतापर्यंत एकूण 11 टन अन्न उपलब्ध करून देण्यात आलं असून सहा टन खाद्य सामग्रीचा पुरवठा रविवारी संध्याकाळी करण्यात आला.


हेही वाचा -

केरळमधील पूरग्रस्तांना विविध संस्था, रुग्णालयांकडून मदत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा