Advertisement

महाराष्ट्रातील ६६ डॉक्टरांचं पथक केरळकडे रवाना

केरळमध्ये आलेल्या पुरामुळे केरळमधील वैद्यकीय सेवा पूर्णपणे कोलमडली असून सद्यस्थित केरळला डॉक्टर आणि औषधांची सर्वात जास्त गरज आहे. केरळला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी रविवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्रातून ६६ तज्ज्ञ डॉक्टरांची टीम पाठवण्याचा निर्णय घेतला

महाराष्ट्रातील ६६ डॉक्टरांचं पथक केरळकडे रवाना
SHARES

गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये महापुरानं हाहाकार माजवला आहे. या महापुरामुळे आतापर्यंत ३२४ जणांचा बळी गेला असून ८ हजार कोटींहून अधिक नुकसान झालं आहे. त्याशिवाय जवळपास २ लाख कुटुंब बेघर झाली. आता या पुरग्रस्तांना देशभरातून मदतीचा हात पुढे येत आहे. या पुरग्रस्तांना वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी महाराष्ट्रातील ६६ डॉक्टरांचं पथक केरळकडे रवाना झालं आहे. यामध्ये जे.जे रुग्णालयातील ५५ डॉक्टरांचा समावेश आहे.


डॉक्टरांची टीम केरळकडे रवाना

केरळमध्ये आलेल्या पुरामुळे केरळमधील वैद्यकीय सेवा पूर्णपणे कोलमडली असून सद्यस्थित केरळला डॉक्टर आणि औषधांची सर्वात जास्त गरज आहे. केरळला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी रविवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्रातून ६६ तज्ज्ञ डॉक्टरांची टीम पाठवण्याचा निर्णय घेतला.

IMG-20180820-WA0002.jpg

या निर्णयानुसार जे. जे. हॉस्पिटलमधून २६ डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, प्रशिक्षक यांच्यासह एकूण ५५ जणांचं टीम केरळकडे रवाना झालं असून ससून रुग्णालयातील २६ जणांची टीम केरलकडे रवाना झाली आहे. विमानाद्वारे ही सर्व टीम आपल्यासोबत औषधं आणि इतर गरजेच्या वस्तू घेऊन जाणार असून जवळपास पाच ते सहा दिवस ही संपूर्ण टीम केरळमध्ये वास्तव्य करणार आहे.

मुंबईतील विविध संस्था, रुग्णालय केरळच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या असून त्यांच्याकडून केरळमधील पूरग्रस्तांसाठी विविध औषध, जीवनावश्यक वस्तू पाठवल्या जात आहे.

IMG-20180820-WA0005.jpg

केइएम रुग्णालयाकडून औषधं आणि वैद्यकीय मदत केइएम रुग्णालयाकडून केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवली जात आहे. विविध प्रकारची औषधं, सॅनिटरी नॅपकिंन्सचा यामध्ये समावेश आहे.

या पुरात अडकलेल्या बऱ्याच लोकांना बाहेर काढण्यासाठी नौसेना, लष्कर, वायूसेना आणि एनडीआरएफच्या जवान शर्थीचे प्रयत्न करत आहे. तसंच सध्याच्या पूर परिस्थितीमुळे केरळमध्ये डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, डायरिया, टायफॉईड, लेप्टोस्पायरोसिस, कॉलरा, कावीळ, ताप यांसारख्या साथीच्या रोगाची साथ पसरण्याची शक्यता आहे. हे रोखण्यासाठी केरळमध्ये पूर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यातील प्रत्येक सरकारी रुग्णालयात वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहे.

IMG-20180820-WA0004.jpg

केरळची सर्व वैद्यकीय सेवा कोलमडल्याने आम्ही मुंबईतून सर्व प्रकारच्या औषधांचा साठा, गरजेच्या वस्तू आमच्यासोबत घेतल्या आहेत. याद्वारे आम्ही तेथील लोकांना वैद्यकीय मदत पुरवणार आहोत. केरळला पूर्वपदावर आण्यासाठी आमची मदत होत असल्याचा आम्हा सर्वाना अभिमान आहे.
- आकाश माने, डॉक्टर, जे. जे. रुग्णालय


हेही वाचा -

केरळमधील पूरग्रस्तांना विविध संस्था, रुग्णालयांकडून मदत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा