Advertisement

मुंबईतील खासदार, नगरसेवकांचाही केरळच्या पुरग्रस्तांसाठी हातभार


मुंबईतील खासदार, नगरसेवकांचाही केरळच्या पुरग्रस्तांसाठी हातभार
SHARES

केरळमध्ये अतिवृष्टीने पूर येऊन जनजीवन ठप्प होण्याबरोबर संपूर्ण केरळची दैनावस्था झाली अाहे. तेथील पुरग्रस्तांसाठी मदतीचे अनेक हात पुढे आलेले असतानाच मुंबईतील खासदार आणि नगरसेवकांनीही आपल्या एक महिन्याच्या मानधनाची रक्कम पुरग्रस्तांना देऊ केली आहे.


राहुल शेवाळे यांची मदत

मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभा क्षेत्राचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी एक महिन्याचं मानधन केरळच्या पुरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. शेवाळे यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि लोकसभेच्या जनरल सेक्रेटरी स्नेहलता श्रीवास्तव यांना पत्र पाठवून आपल्याला मिळणाऱ्या एक महिन्याचं मानधन केरळच्या पुरग्रस्तांसाठी आर्थिक मदत म्हणून जमा करण्याचं कळवलं आहे.


नगरसेविकेचं महापौरांना निवेदन

मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील भाजपाच्या नगरसेविका प्रिती सातम यांनीही महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची भेट घेऊन आपल्या एक महिन्याच्या मानधनाची रक्कम तिरुवअनंतपुरम केरळ येथील महापुराची झळ पोहोचलेल्या व्यक्तींसाठी मदत म्हणून वर्ग करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.


गटनेत्यांच्या सभेत निर्णय

प्रिती सातम यांनी दिलेलं पत्र आगामी गटनेत्यांच्या सभेपुढे ठेवलं जाणार असून त्यामध्ये सातम यांच्यासह सर्व नगरसेवकांचं एक महिन्याचं मासिक मानधन दिलं जावं किंवा कसं याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट केलं. आज अनेक नगरसेवकांची तशी इच्छा असली तरी गटनेत्यांच्या सभेत यावर निर्णय घेऊन तसं जाहीर केलं जाईल,असंही त्यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा - 

महापौर, उपमहापौर वगळता नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी

अकरावीचे ९ हजार विद्यार्थी प्रवेशाविनाच!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा