वर्ल्ड अॅनिमल डे - प्राण्यांचे 'हे' व्हिडिओ तुम्ही पहायलाच हवेत!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

जगभरात 4 ऑक्टोबर हा दिवस 'अॅनिमल डे' म्हणजे 'प्राणी दिवस' म्हणून पाळला जातो. पर्यावरणासोबतच प्राण्यांचेही संरक्षण व्हावे यासाठी 1931 मध्ये इटली येथील फ्लोरेन्स या शहरात एक पर्यावरण परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेत लोकांमध्ये प्राण्यांविषयी संवेदनशीलता आणि आपुलकीची भावना जागृत व्हावी यासाठी 4 ऑक्टोबर हा दिवस 'वर्ल्ड अॅनिमल डे' म्हणून पाळला जावा, असे ठरवण्यात आले. तेव्हापासून हा दिवस 'जागतिक प्राणी दिवस' म्हणून ओळखला जातो.

प्राण्यांचे जतन आणि संरक्षण होणे गरजेचे

प्राण्यांचे जतन आणि संरक्षण व्हावे, यासाठी जागतिक स्तरावर अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. औद्योगिकरणामुळे आज मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत आहे. त्यामुळे अनेकदा वन्य प्राणी मानवी वस्तीत शिरतात. अनेकजण तर पाळलेले प्राणी आजारी पडल्यास किंवा त्यांचे वय झाल्यास त्यांना रस्त्यावर सोडून देतात. 4 ऑक्टोबरला जागतिक प्राणी दिनानिमित्ताने पर्यावरणासोबत प्राण्यांचेही संरक्षण करण्याचे ठरवले, तर ते आपल्यासाठीही नक्कीच फायदेशीर ठरू शकेल.

'जागतिक प्राणी दिना'च्या निमित्ताने 'मुंबई लाइव्ह'चे हे खास व्हिडिओ....


हेही वाचा - 

चला वसुंधरेला सुंदर बनवू !

सेल्फीपॉईंट विरोधात प्राणीमित्रांची तक्रार

पुढील बातमी
इतर बातम्या