उन्हाचा तडाखा प्राणी आणि पक्ष्यांनाही

 Parel
उन्हाचा तडाखा प्राणी आणि पक्ष्यांनाही

दिवसेंदिवस वाढलेल्या उकाड्यामुळे माणसांसोबतच पशु-पक्षीही हैराण झाले आहेत. कडक उन्हामुळे अनेक पशु-पक्षी आजारी झाल्यामुळे परळच्या पशूवैदयकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. वाढत्या उष्म्यामुळे मार्च ते मे महिन्यात अनेक पक्ष्यांना अपचनाचा त्रास जाणवतो, तसेच आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. 

परळच्या पशूवैदयकीय रुग्णालयात जानेवारीपासून ते आतापर्यंत 941 पशूपक्ष्यांवर उपचार करण्यात आले असून, सध्या 490 पशु-पक्ष्यांवर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. जे.सी.खन्ना यांनी दिली. यात 542 कबूतरे, 51 समुद्र पक्षी, 56 कोकीळा, 220 घारी आणि 72 घुबडांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त पोपट, ससे, कुत्रे, बैल, घोडेही मोठया संख्येने विविध समस्यांनी दाखल होत आहेत. 

उन्हाळामुळे हैराण झालेल्या पशु-पक्ष्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. पाणी वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांना ग्लानी येते. या मुक्या जीवांना वाचवण्यासाठी गच्चीत, घराच्या खिडक्यांमध्ये पिण्यास पाणी व अन्न ठेवावे जेणेकरून भूक लागल्यास ते आपली तहान-भूक त्यावर भागवतील, असे खन्ना यांनी सांगितले.

Loading Comments