ट्विटर आपल्या युजर्ससाठी काही ना काही नवे फिचर्स आणत असते. आता देखील ट्विटरनं एक नवीन फिचर आणले आहे. आता तुम्ही ट्विटरवर व्हॉइस रेकॉर्ड करुन ऑडिओ ट्विट करु शकणार आहात. हे फीचर सध्या मर्यादित युजर्ससाठी उपलब्ध आहे.
१४० सेकंदांपर्यंत ऑडिओ रेकॉर्ड करुन व्हॉइस ट्विटमध्ये युजर्स ट्विट करु शकतो. ही मर्यादा जर ओलांडली तर नवीन व्हॉइस नोट सुरू होईल. ट्विटरवर सध्या मेसेज लिहून ट्विट करण्यासाठी 280 शब्दांची मर्यादा आहे. पण व्हॉइस ट्विट फीचरमध्ये व्हॉइस नोटला नेहमीच्या टेक्स्ट ट्विटसोबत अॅड करता येईल. म्हणजेच एकाच ट्विटमध्ये टेक्स्ट आणि व्हॉइस नोट दोन्ही वापरता येईल.
iOS युजर्सना व्हॉइस ट्विट करण्यासाठी न्यू पोस्टवर टॅप करावं लागेल. तिथं कॅमेऱ्याच्या बाजूला असलेल्या ऑडिओ रेकॉर्ड पर्यायावर टॅप केल्यास युजरला व्हॉइस नोट रेकॉर्ड करता येईल. त्यानंतर ‘डन’ बटणावर टॅप करुन शेअर करता येईल.
हेही वाचा