Advertisement

फेसबुकसारखं ट्विटरवर इमोजीद्वारे देता येईल रिएक्शन

आता ट्विटर फेसबुकप्रमाणे रिएक्शन इमोजीची टेस्टिंग करत आहे.

फेसबुकसारखं ट्विटरवर इमोजीद्वारे देता येईल रिएक्शन
SHARES

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर देखील हळूहळू फेसबुकच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. नुकतंच ट्विटरनं फ्लिट्स हे फीचर युजर्ससाठी आणलं आहे. हे फीचर व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुकमधील स्टोरीज या फीचर सारखेच आहे. आता ट्विटर फेसबुकप्रमाणे रिएक्शन इमोजीची टेस्टिंग करत आहे.

टिप्स्टर जेन मनचून वोंगनं यांनी याची माहिती दिली आहे. मात्र अन्य रिपोर्टमध्ये ट्विटरनं असाच प्रयोग २०१५ मध्ये देखील केल्याचं म्हटलं आहे.

जेन मनचुन वोंगनं एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यात फेसबुकप्रमाणेच विविध रिएक्शन असणारे इमोजीचा पर्याय दिसत आहे. फेसबुकवर पोस्टवर प्रतिक्रिया देण्यासाठी अशा इमोजींचा पर्याय मिळतो. मात्र ट्विटवर हे फीचर कधी येणार याची अद्याप माहिती नाही.

दरम्यान, ट्विटरनं नुकतेच फ्लिट्स हे फीचर लाँच केलं आहे. जे फेसबुकच्या स्टेट्सप्रमाणेच आहे. या फीचरद्वारे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करता येईल आणि २४ तासांनी ते आपोआप गायब होईल.



हेही वाचा

झूमला करा टाटा, भारतीय कंपनीला बोला 'से नमस्ते'

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा