Advertisement

तुमच्या मोबाईलमध्ये ट्रूकॉलर आहे? मग...

ट्रूकॉलरच्या ४.७५ कोटी भारतीय युजर्सचा डाटा डार्कवेबवर ७५ हजार रुपयांना विकला

तुमच्या मोबाईलमध्ये ट्रूकॉलर आहे? मग...
SHARES
Advertisement

ट्रूकॉलर हे प्रत्येकाच्या मोबाईमध्ये असतेच. क्वचितच असतील ज्यांच्या मोबाईलमध्ये ट्रूकॉलर नसेल. ट्रूकॉलरमुळे अनोळखी कॉल, स्पॅम कॉल ओळखता येतात. पण आता बातमी आहे की, ट्रूकॉलरच्या ४.७५ कोटी भारतीय युजर्सचा डाटा डार्कवेबवर ७५ हजार रुपयांना विकला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

या संदर्भात ऑनलाईन इंटेलिजेंस कंपनी सायबलनं माहिती दिली आहे. मात्र ट्रूकॉलरनं याबाबत नकार दिला आहे. आमच्या डाटाबेसमध्ये कोणताही ब्रीच झाला नसल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

हा डेटा २०१९ चा असून, यामध्ये राज्य, शहर आणि भागांनुसार डेटा विभागलेला आहे. या डेटामध्ये युजर्सचा फोन नंबर, नाव, लिंग, ईमेल, फेसबुक आयडी आणि इतर खाजगी माहितीचा समावेश असल्याचं सायबलनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यामुळे स्कॅम, फसवणूक होऊ शकते.

मात्र दुसरीकडे ट्रूकॉलर कंपनीनं असा कुठलाच डेटा लीक झाला नसल्याचं म्हटलं आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही युजर्सची प्राव्हेसी आणि सर्व्हिसला गंभीरतेनं घेतो. प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवत असतो. मे २०१९ मध्ये देखील आम्हाला अशा प्रकारच्या डेटा लीकची माहिती मिळाली होती. कदाचित हा तोच डेटाबेस आहे. कंपनीचे नाव वापरून हॅकर्सला डेटा विकण्यास सोपे जाते. कंपनीनं युजर्सला या अफवांना बळी न पडण्याचं आवाहन केलं आहे.



हेही वाचा

टिक-टॉक अ‍ॅपकडे युजर्सची पाठ, भारतीय अ‍ॅप 'मित्रों'ला पसंती

संबंधित विषय
Advertisement