Advertisement

आरोग्य सेतू अ‍ॅपची उंच भरारी, टॉप १० यादीत समावेश

मे महिन्यात जगातील टॉप १० डाऊनलोड करण्यात आलेल्या अॅपच्या यादीत आरोग्य सेतूचा समावेश झाला आहे.

आरोग्य सेतू अ‍ॅपची उंच भरारी, टॉप १० यादीत समावेश
SHARES

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा मागोवा घेण्यासाठी भारत सरकारनं आरोग्य सेतु मोबाइल अॅप सुरू केलं होतं. काही दिवसांपूर्वी या मोबाइल अॅपनं एक नवीन विक्रम तयार केला होता. अवघ्या १३ दिवसांत ५ कोटी लोकांनी आरोग्य सेतु मोबाइल अॅप डाउनलोड केलं होतं. आता आणखी एक विक्रम या अॅपनं केला आहे. जगातील टॉप 10 डाऊनलोड करण्यात आलेल्या अॅपमध्ये आरोग्य सेतूचा समावेश करण्यात आला आहे.

मे महिन्यात जगातील टॉप १० डाऊनलोड करण्यात आलेल्या अॅपच्या यादीत आरोग्य सेतूचा समावेश झाला आहे. कोरोना रुग्णांना ट्रॅक करणाऱ्या या सरकारी अॅपमुळे आरोग्य सेतुवरील लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबतची माहिती नीति आयोगचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी दिली.

याबाबत अमिताभ कांत यांनी ट्विट केलं आहे की, आरोग्य सेतू लाँच केल्यानंतर मे महिन्यात, सलग दुसऱ्या महिन्यात प्रमुख १० डाऊनलोड करण्यात आलेल्या मोबाईल अॅपपैकी एक बनले आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशानं तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे उपयोग करुन जगात नेतृत्व केलं. १४ एप्रिल रोजी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना आरोग्य सेतू अॅप हे डाऊनलोड करण्याचं आवाहन केलं होतं.


आरोग्य सेतु मोबाइल अ‍ॅप म्हणजे?

आरोग्य सेतु अ‍ॅप कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी डिझाइन केला आहे. आरोग्य सेतू अ‍ॅप लोकांना सांगेल की, तुम्ही कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला आहात की नाही. याशिवाय या अ‍ॅपद्वारे कोरोना इन्फेक्शनचा किती धोका आहे? हे देखील आपणास कळू शकेल.


अ‍ॅप कसे काम करते?

आरोग्य सेतु अॅप हिंदी, इंग्रजी आणि मराठी यासह ११ भाषांमध्ये उपलब्ध आहे. या अ‍ॅपमध्ये कोरोना विषाणूपासून बचाव करण्याच्या पद्धतीही नमूद केल्या आहेत. या व्यतिरिक्त, आपल्या प्रवासाच्या हिस्ट्रीनंतर आणि मुळात राहत असलेल्या जागेवरून कोरोना संक्रमणाचा धोका आहे की नाही हे अॅप आपल्याला सांगेल.



हेही वाचा

झूमला करा टाटा, भारतीय कंपनीला बोला 'से नमस्ते'

मित्रो अ‍ॅपला गुगलचा दणका, प्ले स्टोअरमधून हटवलं

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा