Advertisement

मित्रो अ‍ॅपला गुगलचा दणका, प्ले स्टोअरमधून हटवलं

टीक-टॉकला टक्कर देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भारतीय अ‍ॅप मित्रोंला गुगलनं प्ले स्टोरवरून हटवलं आहे.

मित्रो अ‍ॅपला गुगलचा दणका, प्ले स्टोअरमधून हटवलं
SHARES

टीक-टॉकला टक्कर देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भारतीय अ‍ॅप मित्रोंला गुगलनं प्ले स्टोरवरून हटवलं आहे. मागील काही दिवसांपासून हे अ‍ॅप मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करण्यात येत होता. युजर्सची या अ‍ॅपला चांगली पसंती देखील मिळत होती. पण या अपबद्दल काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मित्रो हे अ‍ॅप भारतीय नसून पाकिस्तानी डेव्हलपरनं तयार केल्याचा दावा करण्यात आला होता. अ‍ॅपच्या क्रिएटर्सनं सांगितलं होतं की, ते आपली ओळख उघड करणार नाहीत. यामुळे गुगलनं या अ‍ॅपला दणका दिला आहे.  गुगलनं या अ‍ॅपला स्पॅम आणि मिनिमम फंक्शनॅलिटी पॉलिसीचे उल्लंघन केल्यानं प्ले स्टोरमधून हटवलं आहे.

गुगलच्या पॉलिसीमध्ये म्हटले आहे की दुसऱ्या अ‍ॅपच्या कॉन्टॅक्टमध्ये बदल न करता अथवा काही समावेश न करता अपलोड करणं पॉलिसीच्या विरोधात आहे. थोडक्यात याच्या कोडमध्ये काहीही बदल करण्यात आलेले नाहीत. गुगलनं आता मित्रों अ‍ॅपला रेड प्लॅग्ड आणि सस्पेंड केलं आहे.

मित्रों अ‍ॅप टीकटॉकला टक्कर देईल असं वाटत होतं. महिन्या भरातच ५० लाखांपेक्षा अधिक युजर्सनी हे अ‍ॅप डाऊनलोड केलं होतं. मात्र पाकिस्तानी कंपनी Qboxus चे सीईओ इरफान शेख यांनी हे अ‍ॅप त्यांच्या कंपनीनं तयार केल्याचं म्हटलं. एवढंच नाही तर अगदी कमी किंमतीत त्यांनी दुसऱ्या डेव्हलपरला हे अ‍ॅप विकलं, असा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय या अ‍ॅपमध्ये अनेक बग होते.

काहि दिवसांपूर्वी मित्रो अॅपला चांगली पसंती मिळाल्याचं समोर आलं होतं. टिक टॉकला देखील या अॅपनं मागे टाकलं होतं. जवळपास ५० लाखापेक्षा अदिक वेळा अॅप डाऊनलोड करण्यात आलं होतं. जवळपास ४.७ या अॅपची रेटिंग होती. 



हेही वाचा

तुमच्या मोबाईलमध्ये ट्रूकॉलर आहे? मग...


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा