Advertisement

झूमला करा टाटा, भारतीय कंपनीला बोला 'से नमस्ते'

मुंबईतील स्टार्टअप इनस्क्रिप्टनं भारतीय व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग अ‍ॅप तयार केलं आहे.

झूमला करा टाटा, भारतीय कंपनीला बोला 'से नमस्ते'
SHARES

लॉकडाऊन दरम्यान व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. वर्क फ्रॉम होम असो अथवा मित्र-नातेवाईकांसोबत चर्चा करण्यासाठी असो झूम, गुगल मीट, ड्युओ अशा अनेक अ‍ॅप्सचा वापर मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढला. मात्र सिक्युरिटी आणि प्रायव्हेसीच्या समस्येमुळे सरकारनं झूम आणि दुसरे अ‍ॅप न वापरण्याचा नागरिकांना सल्ला दिला होता. त्यामुळे आता कुठला अ‍ॅप वापरायचा हा प्रश्नच अनेकांना पडला होता.

पण सरकारनं भारतीय व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग अ‍ॅप बनवण्याची देखील भारतीय स्टार्टअप्सला आवाहन केलं होतं. याच आवहानाला प्रतिसाद देत मुंबईतील स्टार्टअप इनस्क्रिप्टनं भारतीय व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग अ‍ॅप तयार केलं आहे. ‘से नमस्ते’ (Say Namaste) असं या अ‍ॅपचं नाव आहे.

‘से नमस्ते’ अ‍ॅपमध्ये ग्रुप व्हिडीओ कॉलवर ५० जण सहभागी होऊ शकतात. या अ‍ॅपमध्ये स्क्रिन शेअरिंग, टेक्स मोड, फाईल शेअरिंग असे अनेक फीचर्स आहेत. व्हिडीओ कॉल सुरू असताना युजर्सला टेक्स मेसेज देखील पाठवता येईल. याशिवाय डॉक्यूमेंट्स, पीडीएफ, प्रेझेंटेशन, फोटो, व्हिडीओ फाईल्स देखील युजर व्हिडीओ कॉलिंग दरम्यान पाठवू शकतील.

जॉईन आणि मिटिंग रूम तयार करणे या अ‍ॅपमध्ये खूप सोपे आहे. यासाठी केवळ स्टार्ट अथवा जॉईन मिटिंग, क्रिएट कोड आणि कनेक्ट यावर क्लिक करावे. आतापर्यंत या अ‍ॅपला प्ले स्टोवर १ लाखांपेक्षा अधिक युजर्सनी डाऊनलोड केलं आहे. अ‍ॅपला प्ले स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवर ४.५ स्टार्स रेटिंग आहे.

सुरुवातीला या अ‍ॅपचे वेब व्हर्जनच उपलब्ध होते. मात्र आता ‘से नमस्ते’ अ‍ॅप गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवर देखील उपलब्ध आहे. कंपनीचे सीईओ अनुज गर्ग म्हणाले की, कंपनी युजर्सच्या प्रायव्हेसी आणि सिक्युरिटीला गंभीरतेनं घेऊ.हेही वाचा

मित्रो अ‍ॅपला गुगलचा दणका, प्ले स्टोअरमधून हटवलं

तुमच्या मोबाईलमध्ये ट्रूकॉलर आहे? मग...

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा