Advertisement

लॉकडाऊनमध्ये मुंबई, दिल्लीत इंटरनेटचा सर्वाधिक वापर

देशभरात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन सुरू आहे. संचारबंदी असल्यामुळे लोकांना घरात बसूनच राहावंं लागत आहे. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी मोबाइलचा सर्वाधिक वापर होत आहे.

लॉकडाऊनमध्ये मुंबई, दिल्लीत इंटरनेटचा सर्वाधिक वापर
SHARES

देशभरात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन सुरू आहे.  संचारबंदी असल्यामुळे लोकांना घरात बसूनच राहावंं लागत आहे. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी मोबाइलचा सर्वाधिक वापर होत आहे. लाॅकडाऊनच्या काळात देशात दिल्ली आणि मुंबईमध्ये सर्वाधिक इंटरनेटचा वापर होत आहे.  इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाने (आयएएमएआय) ताज्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. 

आयएएमएआय आकडेवारीनुसार,  देशात मुंबई शहरात इंटरनेटचा सर्वाधिक वापर होत आहे. मुंबईत इंटरनेट वापरण्यांची संख्या तब्बल 1 कोटी 30 लाख आहे. तर दिल्लीतील हा आकडा 1 कोटी 13 लाख आहे. बंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर असून येथील 66 लाख लोकांनी लाॅकडाऊनच्या काळात इंटरनेट वापरलं आहे.  तर कोलकातामध्ये 63 लाख आणि चेन्नईमध्ये 60 लाख वापरकर्ते आहेत.

मार्च 2019 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीतील 3 कोटी नवे इंटरनेट वापरणारे हे निम्न श्रेणीतील आहेत. त्यापैकी २ कोटी वापरकर्ते ग्रामीण भारतातील आहेत.  भारतातील 2/3 इंटरनेट वापरकर्ते 12 ते 29 वर्षांच्या वयोगटात येतात. आणि हे वयोगट ग्रामीण भागातील इंटरनेट वापरकर्त्यांपैकी 70 टक्क्यांपेक्षा अधिक आहेत.  मुंबई आणि चेन्नईमध्ये 12 ते 29 वर्ष आणि 30 वर्षांपुढील वय असलेल्यांचे इंटरनेट वापरणाऱ्यांचं प्रमाण 50:50 टक्के आहे. 



हेही वाचा -

Maharashtra Breaking | 531 रक्षकच कोरोनाच्या विळख्यात...

१० जूनपर्यंत १०वी व १२वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होणार?




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा