Advertisement

फेसबुक शॉप! आता फेसबुकवर थाटा दुकान

फेसबुक शॉप या सुविधेच्या माध्यमातून दुकानदार त्यांचे दुकान फेसबुकवर सुरू करू शकतात.

फेसबुक शॉप! आता फेसबुकवर थाटा दुकान
SHARES
Advertisement

कोरोनाव्हायरस या महामारीमुळे संकटाचा सामना करावा लागत असलेल्या व्यवसाय आणि व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी फेसबुकनं ऑनलाईन दुकानांची सेवा सुरू केली आहे. 'फेसबुक' Shops ही एक नवीन सर्व्हिस फेसबुक सुरू करणार आहे.

फेसबुक सीईओ मार्क झुकरबर्ग (Facebook CEO Mark Zuckerberg) यांनी सांगितलं की, या सुविधेच्या माध्यमातून दुकानदार त्यांचे दुकान फेसबुकवर सुरू करू शकतात. त्यांच्या पद्धतीने ते वस्तू आणि सामान ऑनलाइन दाखवू शकतात.

छोट्या आणि मध्यम पातळीवरील व्यवसायिकांना ऑनलाइन प्लॅटफॉर्म मिळावा आणि सध्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटकाळात ते स्वत:ला वाचवू शकतील, असं या सुविधेमागचं ध्येय आहे.

कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग एका लाईव्ह स्ट्रिमिंगमध्ये म्हणाले की, महामारीच्या या काळात अर्थव्यवस्था पुन्हा उभी करण्यासाठी ई-कॉमर्सचा विस्तार करणे महत्त्वाचे आहे. जर दुकान अथवा हॉटेल उघडता येत नसेल तर ऑनलाईन ऑर्डर घेऊन लोकांना पाठवता येईल. व्यापारी ऑनलाईन दुकाने सुरू करू शकतात. सोबतच यासाठी जाहिरात देखील देऊ शकतील.

  • Facebook Shops च्या माध्यमातून एक सिंगल ऑनलाइन स्टोअर बनवण्यात येईल जे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर उपलब्ध असेल.
  • यातील चेकआऊट फीचरच्या माध्यमातून in-app खरेदी करता येईल आणि मेसेजिंग फीचरच्या माध्यमातून कस्टमर WhatsApp आणि Instagram Direct वर व्यवसायिकांसाठी संभाषण देखील करू शकतात.
  • आणखी 7 ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सबरोबर मिळून या फेसबुकच्या या प्लॅटफॉर्मवर अधिक व्यवसायिक आणि प्रोडक्ट्सबरोबर जोडले जाण्याचा मानस आहे.
  • ऑनलाइन दुकान व्यवसायिकांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवर पाहता येतील. त्याचप्रणामे दुकानदार स्टोरीज देखील पोस्ट करू शकतात तसंच ऑनलाइन जाहीरात देण्याचा देखील पर्याय आहे.
  • व्यवसायिकांनी उपलब्ध केलेले प्रोडक्ट्स ग्राहकांना कार्टमध्ये टाकता येतील किंवा ऑर्डर देखील देता येईल. फेसबुकनं गेल्या वर्षी इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर काही मर्यादित शॉपिंग पर्याय उपलब्ध करून दिले होते. हीच सुविधा आता विस्तारित स्वरूपात पुरवण्यात येणार आहे.
  • कंपनीनुसार या निर्णयात युजर ग्रोथ कमी असली तरीही कंपनीचे हे प्लॅटफॉर्म अधिक बिझनेस फ्रेंडली बनेल आणि फेसबुकचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.हेही वाचा

लॉकडाऊनमध्ये मुंबई, दिल्लीत इंटरनेटचा सर्वाधिक वापर

फेसबुकवर व्हिडीओ पाहताय? मग मोजावे लागू शकतात पैसे

संबंधित विषय
Advertisement