Advertisement

फेसबुकवर व्हिडीओ पाहताय? मग मोजावे लागू शकतात पैसे

Facebook युजरसाठी एक मोठी बातमी आली आहे. फेसबुकवर व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागू शकतात. पण...

फेसबुकवर व्हिडीओ पाहताय? मग मोजावे लागू शकतात पैसे
SHARES

लॉकडाऊनमध्ये अधिक वेळ हा सोशल मीडियावर घालवला जात आहे. त्यात फेसबुकचा वापर हा अधिक असतो हे काही नाकारता येऊ शकत नाही. वेगवेगळे व्हिडीओ शेअर करण्यासाठी फेसबुकचा देखील वापर केला जातो. त्यामुळे वेगेवगळ्या विषयांवर आधारीत व्हिडीओ फेसबुकवर पाहिले जातात. मात्र आता Facebook युजरसाठी एक मोठी बातमी आली आहे. फेसबुकवर व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागू शकतात.


'या' व्हिडीओजसाठी लागणार पैसे

फेसबुकवर (Facebook) लाईव्ह व्हिडीओ पाहण्यासाठी आता युजरना पैसे द्यावे लागणार आहेत. कोरोनामध्ये परफॉर्मिंग आर्टशी संबंधित लोकांना मदत करण्यासाठी फेसबुकनं हे पाऊल उचललं आहे.


यासाठी घेतला हा निर्णय

दरम्यान, फेसबुकवर लाईव्ह व्हिडीओ करण्याआधी या लोकांकडे आपला व्हिडीओ विनामूल्य ठेवायचा की शुल्क आकारायचे हे सिलेक्ट करू शकतात. लॉकडाऊनमुळे संगीतकार, विनोदकार, वैयक्तिक प्रशिक्षक, स्पीकर्स यासारखे लोक कुठेही आपली कला सादर करू शकत नाही आहेत. म्हणून ते फेसबुकवर लाइव्ह व्हिडीओद्वारे लोकांशी संपर्क साधत आहेत. द व्हर्जनं दिलेल्या वृत्तानुसार अशा परिस्थितीत फेसबुक, निर्मात्यांना आणि छोट्या व्यवसायांना लाइव्ह व्हिडीओवर प्रवेश शुल्काचा पर्याय देऊन त्यांना मदत करू इच्छित आहे.


डोनेट बटणाचाही पर्याय

फेसबुकचे नवीन टूल त्यांनाही मदत करणार आहे, जे चॅरिटीसाठी निधी जमा करू इच्छितात. यासाठी लाइव्ह व्हिडीओमध्ये डोनेट बटणाचा पर्याय देऊ शकतात. या पर्यायातून जमा झालेली १०० टक्के रक्कम फेसबुक थेट ना नफा संस्थेच्या खात्यावर पाठवते आणि यातील कोणताही हिस्सा फेसबुक स्विकारणार नाही.


अधिकृत घोषणा नाही

फेसबुकच्या वतीनं या नव्या फिचरबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही आहे. हे फिचर कधीपासून येणार याबाबतही कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे.



हेही वाचा

झुमला करा 'टाटा बाय बाय', या भारतीय अॅपला करा 'नमस्ते'

COVID 19 : कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवणार रिस्टबँड

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा