Advertisement

झुमला करा 'टाटा बाय बाय', या भारतीय अॅपला करा 'नमस्ते'

भारतात हे अॅप तयार झालं आहे. याची चाचणीही घेण्यात येत असून बीटा व्हर्जन उपलब्ध आहे.

झुमला करा 'टाटा बाय बाय', या भारतीय अॅपला करा 'नमस्ते'
SHARES

जगभरात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी दिली आहे. सध्या ऑफिस मीटिंगसाठी व्हिडिओ कॉलिंगचं झूम हे अॅप वापरलं जात होतं. मात्र त्यामध्ये युजर्सचा डेटा लीक झाल्याचं समोर आल्यानंतर लोकांनी याला पर्याय शोधण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान भारतात से नमस्ते (Say Namaste) हे अॅप तयार झालं आहे. याची चाचणीही घेण्यात येत असून बीटा व्हर्जन उपलब्ध आहे.

Say Namaste अॅपची निर्मिती कऱणाऱ्या कंपनीचे सीईएओ अनुज गर्ग यांनी सांगितलं की, अॅपचे प्री बीटा व्हर्जनबद्दल पर्सनल फेसबुक अकाउंटवरून माहिती दिली होती. किमान १०० युजर्सनी हे अॅप टेस्ट करावं अशी आमची अपेक्षा होती. पण काही वेळातच पाच लाख युजर्सनी हे अॅप वापरलं. अजुनही पूर्ण सेवा सुरू करण्यात आलेली नाही.


अॅपवर काम सुरू

दरम्यान, Say Namaste अॅपची माहिती सोशल मीडियावरून फिरू लागली. भारत सरकारनं हे अॅप सुरू केल्याचा दावाही करण्यात आला. त्याबद्दल सांगताना गर्ग म्हणाले की, हे अॅप पुर्णपणे खासगी आहे. त्यांची टीम आणि इतर ५० डेव्हलपर्स यावर काम करत आहेत. यासंदर्भात सरकारकडून कोणत्या सूचना किंवा माहिती देण्यात आलेली नाही. अनेकजण याबाबत बोलत आहेत हे सकारात्मक आहे. सरकारसोबत काम करायला आवडेल असंही गर्ग यांनी सांगितलं.


लवकरच उपलब्ध होईल

सध्या हे अॅप बीटा व्हर्जनमध्ये आहे. याला मोबाइल आणि लॅपटॉप दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरता येतं. जर तुम्ही अॅप ओपन केलंत तर त्यावर मेसेज येतो की, "We are facing tremendous demand for NAMASTE and hence you may face some temporary connectivity issues. Please check back soon" त्यामुळे आता लवकरच बीटा व्हर्जनची टेस्ट झाल्यानंतर अॅप सर्वांसाठी उपलब्ध होईल.


अॅपची खासियत

नमस्ते अॅपवरून झूमप्रमाणेच व्हिडिओ कॉलसह मीटिंग लिंक तयार करता येते. तसंच ती लिंक शेअरही करता येते. या मीटिंगमध्ये एकाचवेळी किती जण व्हिडिओमध्ये येऊ शकतात याची माहिती मिळाली नाही. याच्या मोबाइल व्हर्जनमध्ये रिअर कॅमेरा स्विच करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. तसंच कॉल करताना फक्त ऑडिओ कॉलचीही सुविधा देण्यात आली आहे. याचं अँड्रॉइड आणि आयओएस व्हर्जन लवकरच लाँच केलं जाण्याची शक्यता आहे.


कसं वापरायचं अॅप?

https://www.saynamaste.in/  या लिंकवर क्लिक केल्यानंतर पेज ओपन होईल. त्यामध्ये "Create new meeting" या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमचं नाव लिहा. नाव लिहिल्यानंतर एक मिटिंग युआरएल तिथं मिळेल. त्यासोबत मिटिंग आयडी आणि कोड मिळेल.

मिटिंग आयडी कोड आणि युआरएल कॉपी पेस्ट करून मिटिंगमध्ये भाग घेणाऱ्यांना पाठवता येतो. यात मिटिंगमध्ये सहभागी होणाऱ्यांना इनव्हाइट करता येतं. त्याशिवाय ज्याच्याकडे मिटिंगच्या डिटेल्स आहेत ती व्यक्तीसुद्धा अॅड होऊ शकते.



हेही वाचा

Zoom App वापरताय? सावधान, सरकारच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नको

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा