मुंबई-दिल्ली विमान तिकीट दर १० हजारांपर्यंत

देशात सोमवारपासून टप्प्याटप्प्याने विमान सेवा सुरू होणार आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने विमान प्रवासाचे नियमही जारी केले आहेत. आता विमान प्रवासाचा किमान आणि कमाल तिकीट दरही निश्चित करण्यात आला आहे. यानुसार मुंबई ते दिल्ली विमान तिकीट किमान ३५०० ते कमाल १० हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत विमान कंपन्यांकडून किमान ते कमाल तिकीट दर संबंधित वेबसाइटवर दाखवला जायचा. पण आता विमान तिकीट परवडणारं असावं, असं हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे किमान आणि कमाल तिकीट निश्चित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. दिल्ली ते मुंबईसाठी किमान तिकीट दर ३५०० ते कमाल तिकीट १० हजार रुपयांपर्यंत असेल.

मेट्रो ते मेट्रो शहराच्या प्रवासासाठी २०२० च्या उन्हाळ्यातील वेळापत्रकानुसार एक तृतीयांश म्हणजेच ३३.३३ टक्के विमानांना परवानगी देण्यात आली आहे. तर मेट्रो ते नॉन मेट्रो किंवा या उलट उड्डाणे १०० पेक्षा जास्त आहेत. विमान मार्गांचं वर्गीकरण ७ प्रकारांमध्ये करण्यात आलं आहे. यामध्ये ०-३० मिनिट, ३०-६० मिनिट, ६०-९० मिनिट, ९०-१२० मिनिट, १२०-१५० मिनिट, १५०-१८० मिनिट आणि १८० ते २१० मिनिट असं हे वर्गीकरण आहे.


हेही वाचा -

खासगी नर्सिंग होम, रुग्णालय सुरू न केल्यास होणार कारवाई

नॉन एसी ट्रेनसाठी ऑनलाइन बुकिंगची वेळ जाहीर


पुढील बातमी
इतर बातम्या