कुर्ल्यात विराजला स्थानिकांचा राजा

  Kurla
  कुर्ल्यात विराजला स्थानिकांचा राजा
  मुंबई  -  

  कुर्ला - कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक दुकानदार आणि रिक्षा-टॅक्सी चालक सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहेत. कुर्ल्याचा राजा म्हणून या गणपतीची ओळख असून अगदी साध्या पध्दतीने गणपतीची सजावट असते. चाकरमान्यांची कुर्ला रेल्वे स्थानकात मोठी गर्दी असल्याने १० दिवस ते या गणपतीचे दर्शन घेऊनच कामावर जात असतात. त्यामुळे दिवसभर या गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पहायला मिळते. दहा दिवस संपूर्ण पूर्वेकडील परिसराला विद्युत रोषणाई केली जाते. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण आहे. 

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.