Advertisement

मानसिक आजारांवर आधारित मानसशास्त्रीय भय पुस्तक


मानसिक आजारांवर आधारित मानसशास्त्रीय भय पुस्तक
SHARES

भारतातील पहिल्या मानसशास्त्रीय काल्पनिक भय पुस्तकाचं प्रकाशन बिगबॉस ८ मधील सदस्य आणि एलजीबीटीक्यू कार्यकर्ता सुशांत दिवगीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. 'ऍज डेथ स्टेअर्ड बॅक' असं या पुस्तकाचं नाव आहे. हे पुस्तक लेखक, माजी-शास्त्रज्ञ आणि आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी अजिंक्य भस्मे यांनी लिहीलं आहे.  हे पुस्तक मानसिक रुग्णाच्या जीवनातील वास्तविक घटनांवर आधारित आहे.  कॅपग्रास भ्रम आणि मानसिक आजारांबाबत भारतात जागरूकता निर्माण करणं हा लेखकाचा उद्देश आहे.

'ऍज डेथ स्टेअर्ड बॅक' हे भस्मे यांचे दुसरे पुस्तक असून यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष घडलेली मानसशास्त्रीय भयकथा मांडली आहे.  ही कथा एका आधुनिक काळातील संयुक्त कुटुंबात घडते. या कुटुंबातील पुरुषाचं अकस्मात निधन झाल्यानंतर कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य उध्वस्त होतं. दहा वर्षांनंतर अचानक एक दिवस त्यांच्या दारात एक माणूस उभा राहतो आणि त्या स्त्रीचा दिवंगत पती असल्याचा दावा करतो.  या प्रसंगामुळे कथेला अचानक कलाटणी मिळते.  अशा विविध चढउतारांमुळे वाचक सहजासहजी पुस्तक खाली ठेवूच शकणार नाहीत.

"भारतीय समाजात मानसिक आरोग्याबद्दल खुलेपणाबद्दल बोललं जात नाही त्यामुळे कॅपग्रास भ्रमाबद्दल अजिबात जागरूकता नाही. या सिंड्रोमबद्दल आजवर अतिशय कमी संशोधन करण्यात आलं आहे. पण हा अतिशय भयानक सिंड्रोम असून याचा परिणाम फक्त रुग्णावरच नाही तर रुग्णाची काळजी घेत असलेल्या व्यक्तीवर देखील होतो." 

अजिंक्य भस्मे, लेखक

पुस्तकाची संकल्पना खूप छान आहे आणि श्री भस्मे यांनी आपल्या अनोख्या लेखनकौशल्याने जी किमया घडविली आहे जी अतिशय अभिनंदनीय आहे.  मानवी मनातील भीती आणि आत्म्याच्या दुःखाची ही कथा आहे. 'ऍज डेथ स्टेअर्ड बॅक' या पुस्तकातील प्रत्येक शब्द अतिशय काळजीपूर्वक आणि हुशारीनं वापरण्यात आला आहे.  हे पुस्तक वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते, असं 'द स्टोरी इंक'चे चीफ स्टोरीटेलर सिद्धार्थ जैन यांनी सांगितलं. 


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा