बिग बींनी घेतली 98 वर्षांच्या चाहतीची भेट!


SHARE

बिग बी बॉलिवूडमध्ये त्यांच्या दिलदार स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांच्या या दिलदार स्वभावामुळेच चाहत्यांच्या मनात त्यांच्यासाठी खास स्थान आहे. आपल्या चाहत्यांच्या प्रेमाचा ते नेहमीच आदर करतात. अशाच एका ९८ वर्षीय चाहतीची बिग बींनी भेट घेतली. या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'युद्ध' या सोनी टीव्हीवरील मालिकेत बिग बींच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहाना कुमरा हिच्या विनंतीवरून त्यांनी आपल्या चाहतीची भेट घेतली. आहानाच्या मैत्रिणीची आजी अमिताभ यांची मोठी चाहती आहे. मैत्रिणीनं 'अमिताभ आणि आजीची भेट घडवून दे' अशी इच्छा आहानाकडे व्यक्त केली होती. आहाना तिला नाही म्हणू शकली नाही. त्यानुसार आजींना भेटण्याची विनंती आहानानं अमिताभ यांना केली होती. आहानाच्या विनंतीला मान देत बिग बींनी तात्काळ होकार कळवला.


मी खूप नशीबवान आहे जे मला अमिताभ यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. मला जेव्हा माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि तिनं माझ्या आजीला अमिताभ यांना भेटायची इच्छा असल्याचं सांगितलं, तेव्हा मी अमिताभ यांच्या टीमशी संपर्क साधला. अमिताभ यांच्याकडून लगेच होकार देखील आला.

आहाना कुमरा, अभिनेत्री


अमिताभ यांनी वेळात वेळ काढून या ९३ वर्षीय आजींची भेट घेतली. या भेटीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या फोटोत आजींनी अमिताभ यांना भेटवस्तू देखील दिल्याचं दिसत आहे. त्यामुळे नक्कीच आजींसाठी ही भेट संस्मरणीय ठरली असणार यात शंका नाही!


संबंधित विषय
ताज्या बातम्या