Advertisement

'हा' आहे ऋतिकचा अनोखा फंडा

कोणत्याही सिनेमातील आपली व्यक्तिरेखा साकारण्याची प्रत्येक कलाकाराची आपली एक शैली असते. तशी ऋतिकचीही आहे, पण ती यशस्वी करण्यामागचा अनोखा फंडा 'सुपर ३०' या सिनेमाच्या निमित्तानं सर्वांसमोर आला आहे.

'हा' आहे ऋतिकचा अनोखा फंडा
SHARES

अभिनेता ऋतिक रोशननं नेहमीच आव्हानात्मक भूमिकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून, त्यात तो नेहमीच यशस्वी ठरला आहे. सध्या 'सुपर ३०' या सिनेमामुळं चर्चेत असलेल्या ऋतिकच्या या यशामागील रहस्य काय? असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल, पण आता यावरून पडदा उठला आहे.


परफ्यूमचा चाहता 

कोणत्याही सिनेमातील आपली व्यक्तिरेखा साकारण्याची प्रत्येक कलाकाराची आपली एक शैली असते. तशी ऋतिकचीही आहे, पण ती यशस्वी करण्यामागचा अनोखा फंडा 'सुपर ३०' या सिनेमाच्या निमित्तानं सर्वांसमोर आला आहे. बॉलीवूडचा मॅचो मॅन म्हणून ओळखला जाणारा ऋतिक खाजगी जीवनात परफ्यूमचा खूप मोठा चाहता आहे. ऋतिक नेहमी आपल्या प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी वेगळा परफ्यूम निवडतो हे कदाचित खूप जणांना माहित नसेल. 


दमदार भूमिकेत 

ऋतिकनं आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी वेगळा परफ्यूम वापरला आहे. ऋतिकनं आपल्या व्यक्तिरेखेनुसार प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या परफ्युमचा वापर केला आहे. याच कारणामुळं ऋतिककडं परफ्युमचं खूप मोठं कलेक्शन आहे. आगामी 'सुपर ३०' या चित्रपटामध्ये ऋतिक एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. 


२६ जुलैला प्रदर्शित 

या चित्रपटात ऋतिकनं पटनामधील एक हुशार पण आर्थिक दृष्टीनं मागासलेल्या शिक्षकाची भूमिका साकारली आहे. ध्येयपूर्तीसाठी वाट्टेल ते कष्ट घेण्याची तयारी असलेल्या शिक्षकाची ही कथा आहे. या चित्रपटात तो आजवर कधीही न दिसलेल्या रुपात दिसणार आहे. 'सुपर ३०'साठी या अभिनेत्यानं बेयर्डो नावाच्या परफ्युमचा उपयोग केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या सिनेमात ऋतिकसोबत मृणाल ठाकूर, अमित साद आणि नंदीश संधू सहायक भूमिकेत दिसतील. हा चित्रपट २६ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा - 

सईचं 'सही' फोटोसेशन पाहिलं का?

Movie Review : वास्तवाची जाणीव अन् व्यवस्थेला टोला
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा