सईचं 'सही' फोटोसेशन पाहिलं का?

सईनं नुकतीच हॅलो हॅाल आॅफ फेम अॅवॅार्ड समारंभाला हजेरी लावली होती. या सोहळ्यात तिनं परिधान केलेला एखाद्या हॅालीवूड स्टारच्या तोडीचा गाऊन चर्चेचा विषय ठरला. छायाचित्रकारांपासून सर्वांचंच लक्ष वेधून तिनं वेधून घेतलं.

  • सईचं 'सही' फोटोसेशन पाहिलं का?
  • सईचं 'सही' फोटोसेशन पाहिलं का?
  • सईचं 'सही' फोटोसेशन पाहिलं का?
SHARE

अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या भलतीच फॅार्मात आहे. 'पाँडेचेरी'हून परतल्यापासून ती रोज नवनव्या पोझमध्ये फोटोसेशन करताना दिसत आहे. तिचे हे फोटोही सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होत आहेत. सईच्या हॅाट अदा दर्शवणारे हे काही फोटो 'मुंबई लाइव्ह'च्या वाचकांसाठी...


चित्रीकरणात व्यग्र

मागील काही दिवसांपासून सई सोशल मीडियापासून दूर गेली होती. या दरम्यान ती पाँडीचेरीमध्ये दिग्दर्शक सचिन कुंडलकरच्या 'पाँडीचेरी' या आगामी मराठी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र होती. तिथून परतल्यावर सई पुन्हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाली आहे. यासोबतच ती नेहमीच चर्चेतही राहात आहे. मागच्या आठवड्यात तिनं एक वेगळ्या गेटअपमध्ये फोटोशूट केलं होतं. त्याला तिच्या चाहत्यांची पसंती लाभली होती. आता पुन्हा एकदा नव्या ओकेजनला सईनं नवं शूट केलं आहे.


मादक पोझेस

सईनं नुकतीच हॅलो हॅाल आॅफ फेम अॅवॅार्ड समारंभाला हजेरी लावली होती. या सोहळ्यात तिनं परिधान केलेला एखाद्या हॅालीवूड स्टारच्या तोडीचा गाऊन चर्चेचा विषय ठरला. छायाचित्रकारांपासून सर्वांचंच लक्ष वेधून तिनं वेधून घेतलं. छायाचित्रकारांनी फोटोसाठी गर्दी करताच सईनंही एकापेक्षा एक मादक पोझेस देत आपल्या चाहत्यांना खुश केलं आहे. हेही वाचा -

सर्वसामान्यांमधील असामान्यांच्या कर्तृत्वाला अंशुमनचा सलाम!

प्रनूतन-झहीरच्या 'नोटबुक'मध्ये सलमानचा जलवा
संबंधित विषय