Advertisement

सर्वसामान्यांमधील असामान्यांच्या कर्तृत्वाला अंशुमनचा सलाम!

विनोदी भूमिकांद्वारे प्रेक्षकांना हसवणाऱ्या अंशुमन विचारेनं हेच हेरलं आणि असामान्य व्यक्तीमत्वांच्या कर्तृत्वाला सलाम करणारा पुरस्कार सोहळा सुरू केला आहे. ठाण्यातील डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये रंगलेल्या ‘अ. क. स.’ म्हणजे ‘असामान्य कर्तृत्वाला सलाम’ या पुरस्काराच्या माध्यमातून अंशुमननं समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींना सलाम केला आहे.

सर्वसामान्यांमधील असामान्यांच्या कर्तृत्वाला अंशुमनचा सलाम!
SHARES

सिनेमा, नाटक आणि मालिकांशी निगडीत असणाऱ्यांना पुरस्कार देणारे बरेच सोहळे आहेत, पण सर्वसामान्यांमध्ये दडलेल्या असामान्यांना शोधून त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेणारे पुरस्कार सोहळे फार कमी आहेत. विनोदी भूमिकांद्वारे प्रेक्षकांना हसवणाऱ्या अंशुमन विचारेनं हेच हेरलं आणि असामान्य व्यक्तीमत्वांच्या कर्तृत्वाला सलाम करणारा पुरस्कार सोहळा सुरू केला आहे.


समाजोपयोगी कार्याचा गौरव

ठाण्यातील डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये रंगलेल्या ‘अ. क. स.’ म्हणजे ‘असामान्य कर्तृत्वाला सलाम’ या पुरस्काराच्या माध्यमातून अंशुमननं समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींना सलाम केला आहे. विशेष म्हणजे समाजातील इतर कर्तृत्ववान व्यक्तींच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. गोव्यातील फाॅरेन रिटर्न हृदयरोगतज्ज्ञ डाॅ. शिरीष बोरकर, थिलेसिमीयाग्रस्तांसाठी कार्य करणाऱ्या अहमदनगरच्या डाॅ. अंजली केवळ, आदिवासींसाठी कार्यरत असणाऱ्या ठाण्यातील वर्षा परचुरे, ठाण्यात पोळीभाजी केंद्राच्या माध्यमातून समाजसेवा करणाऱ्या स्मिता निमकर आणि अनाथांचा नाथ बनलेल्या पुण्यातील इंजिनीयर अशोक देशमाने यांना ‘अ. क. स.’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं.अ क स पुरस्कार प्रदान

या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, विजय गोखले, किशोरी आंबिये, अरुण नलावडे, पॅडी कांबळे आदी सिनेसृष्टीतील मंडळी उपस्थित होती. अंशुमन विचारे अक्टिंग अॅकॅडमीच्या माध्यमातून विजेत्यांना ‘अ क स’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात प्रकाशझोतात न येता समाजोपयोगी दृष्टिकोनातून कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा गौरव करण्यात येतो. यंदाचं हे पुरस्काराचं पहिलं वर्ष आहे. अंशुमन विचारे अॅक्टिंग अॅकॅडमीचे संचालक राजेंद्र पवार यांनी या सोहळ्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.


डाॅ. सोनाली लोहार परीक्षक

या पुरस्कार सोहळ्याला सिनेसृष्टीतील दिग्गजांसह राजकीय, व्यावसाय आणि इतर क्षेत्रांमधील मान्यवरांनीही हजेरी लावली होती. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरमध्ये रंगलेल्या या सोहळ्याची व्याप्ती आणि गर्दी पाहून ठाण्यातील सुधाकर चव्हाण यांनी पुढील वर्षी हा सोहळा एखाद्या भल्या मोठ्या मैदानात होणार अशी ग्वाही देत ‘अ क स’च्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. डाॅ. सोनाली लोहार यांनी 'अ क स'चं परीक्षक म्हणून काम पाहिलं, तर स्मिता गवाणकर यांनी या संपूर्ण सोहळ्याचं सूत्र संचालन केलं.


टाळ्या-शिट्यांचा वर्षाव

पॅडी कांबळेनं नृत्याच्या माध्यमातून गणेशाला वंदन करत या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आलं. प्रसाद खांडेकर, समीर चौघुले, भक्ती रत्नपारखी यांनी विनोदी स्कीट्सच्या माध्यमातून उपस्थितांना हसवलं. एरव्ही काॅमेडी करत हसवणाऱ्या विशाखा सुभेदारनं चक्क हिंदी गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरत नृत्य केलं. तिच्या जोडीला विनोदवीर अरुण कदमचं नृत्याचा ठेका धरला. गायिका वीणा वायकुळ यांनी नाट्यपदं, तर स्नेहा कुलकर्णीनं हिंदी गाणी सादर केली. पूजा सुर्वे ग्रुप ग्रुपच्या विद्यार्थीनींनी रिदमिक जिम्नॅशियम अंतर्गत सादर केलेलं नृत्य टाळ्या-शिट्यांचा वर्षाव करणारी ठरली.हेही वाचा -

उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकण मार्गावर ५२ स्पेशल गाड्या

आमिरसाठी अतुल बनला लेखक!संबंधित विषय
Advertisement