Advertisement

उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकण मार्गावर ५२ स्पेशल गाड्या

मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकणात मुंबई ते करमाळी-सावंतवाडीदरम्यान ५२ उन्हाळी स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचे आरक्षण १६ मार्चपासून सुरू होणार आहे.

उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकण मार्गावर ५२ स्पेशल गाड्या
SHARES

दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी अनेक प्रवासी कोकणाची वाट पकडतात. तसंच उन्हाळी सुट्टी असल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकणात मुंबई ते करमाळी-सावंतवाडीदरम्यान ५२ उन्हाळी स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचं आरक्षण १६ मार्चपासून सुरू होणार आहे. त्याशिवाय या सर्व विशेष गाड्यांचे सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित डब्यांच्या रूपात चालविले जाणार आहेत.


लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी साप्ताहिक (८ फेऱ्या )

०१०५१ ही स्पेशल गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून १७ मे ते ७ जूनदरम्यान दर शुक्रवारी रात्री ८.४५ वाजता सुटेल. तर, ०१०५२ हा गाडी करमाळीहून १९ मे ते ९ जूनदरम्यान दर रविवारी दुपारी १२.५० वाजता सुटेल


करमाळी ते लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक (८ फेऱ्या)

०१०१६ ही विशेष गाडी करमाळीहून १८ मे ते ८ जूनदरम्यान दर शनिवारी दुपारी १२.५० वाजता सुटेल. तर, ०१०१५ ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून १९ मे ते ९ जूनदरम्यान दर रविवारी मध्यरात्री १.१० वाजता सुटेल.


लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी साप्ताहिक (१८ फेऱ्या)

०१०४५ ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून१२ एप्रिल ते ७ जूनदरम्यान दर शुक्रवारी रात्री १.१० वाजता सुटेल. तर, ०१०४६ ही गाडी करमाळीहून १८ मे ते ८ जूनदरम्यान दर शुक्रवारी दुपारी १२.५० वाजता सुटेल.


लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड साप्ताहिक (१८ फेऱ्या)

०१०३७ ही विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून ८ एप्रिल ते ३ जूनदरम्यान दर सोमवारी रात्री १.१० वाजता सुटेल. तर, ०१०३८ ही विशेष गाडी सावंतवाडी येथून ८ मे ते ६ जूनदरम्यान दर सोमवारी दुपारी २.१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री १२.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहचेल.



हेही वाचा -

आमिरसाठी अतुल बनला लेखक!

Movie Review : वास्तवाची जाणीव अन् व्यवस्थेला टोला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा