Advertisement

प्रनूतन-झहीरच्या 'नोटबुक'मध्ये सलमानचा जलवा

सलमाननं यापूर्वी सुनील शेट्टीची मुलगी आथिया आणि आदित्य पांचोलीचा मुलगा सूरजला 'हिरो' सिनेमात सादर केलं आहे. या सिनेमासाठी सलमाननं जसं एक गाणं गायलं होतं, तसंच 'नोटबुक'साठीही गाणं गायलं आहे.

प्रनूतन-झहीरच्या 'नोटबुक'मध्ये सलमानचा जलवा
SHARES

नितीन कक्कड दिग्दर्शित 'नोटबुक' या आगामी सिनेमाची आज सगळीकडे चर्चा आहे. या सिनेमात प्रनूतन आणि झहीर ही नवी जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच या सिनेमात प्रेक्षकांना सलमान खानचा जलवाही पहायला मिळणार आहे.


सलमाननं गाणं गायलं

बॅालीवूडमध्ये 'यारों का यार' म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अभिनेता सलमान खाननं नेहमीच आपल्या होम प्रॅाडक्शनमध्ये बनणाऱ्या सिनेमाद्वारे नवोदितांना लाँच केलं आहे. सलमाननं यापूर्वी सुनील शेट्टीची मुलगी आथिया आणि आदित्य पांचोलीचा मुलगा सूरजला 'हिरो' सिनेमात सादर केलं आहे. या सिनेमासाठी सलमाननं जसं एक गाणं गायलं होतं, तसंच 'नोटबुक'साठीही गाणं गायलं आहे. रोमँटिक स्टोरी असलेल्या या सिनेमातील 'मैं तेरे...' हे गीत सलमाननं गायलं असून, त्याच्यावरच ते चित्रीतही करण्यात आलं आहे.


विशाल मिश्रांचं संगीत

सलमानच्या आवाजात रेकॅार्ड करण्यात आलेलं 'मैं तुम्हे...' हे गीत सध्या सोशल मीडियापासून एफएमवर चांगलंच गाजत आहे. या सिनेमातील हे चौथं गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. गीतकार मनोज मुंतशीर यांनी लिहिलेलं हे गीत संगीतकार विशाल मिश्रा यांनी संगीतबद्ध केलं आहे. सलमाननं जेव्हा प्रनूतन आणि झहीर इकबाल यांना घेऊन जेव्हा 'नोटबुक' हा सिनेमा बनवणार असल्याची घोषणा केली, तेव्हापासूनच हा सिनेमा खऱ्या अर्थानं चर्चेत आला आहे. त्यामुळे यात सलमानचं गाणंही असणं हे त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब आहे.


२९ मार्चला प्रदर्शित

यापूर्वी या सिनेमातील प्रनूतन आणि झहीर यांच्यावर चित्रीत करण्यात आलेली 'नहीं लगदा...', 'लैला...' आणि 'बुमरो...' ही तीन गाणी लाँच करण्यात आली आहेत. नयनरम्य लोकेशन्स आणि निसर्गसौंदर्यामुळे या गाण्यांना चांगलीही पसंती मिळाली आहे. या सिनेमाची कथा काश्मीरच्या पार्श्वभूमीवर घडणारी असल्यानं प्रेक्षकांना तिथला नेत्रसुखद निसर्ग पाहायला मिळणार आहे. यात कधीही न भेटता एकमेकांच्या प्रेमात पडणाऱ्या तरुण-तरुणीची कथा पाहायला मिळेल. हा सिनेमा २९ मार्चला प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा -

Movie Review : वास्तवाची जाणीव अन् व्यवस्थेला टोला

आमिरसाठी अतुल बनला लेखक!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा