Advertisement

राकेश रोशन यांना कॅन्सर


राकेश रोशन यांना कॅन्सर
SHARES

प्रख्यात दिग्दर्शक आणि अभिनेते राकेश रोशन यांना कॅन्सरचं निदान झाल्याचं समोर आलं आहे. राकेश रोशन यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कॅन्सर झाल्याची माहिती हृतिक रोशननं दिली. यासंदर्भात त्यानं इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे.


 हे आमचं भाग्य 

'आज सकाळी मी वडिलांना सोबत फोटो काढण्यासाठी विचारलं. सर्जरीच्या दिवशीही जीमला येणं ते विसरणार नाहीत याची मला खात्री होती. माझ्या परिचयात असणाऱ्यांपैकी ते सर्वात कणखर व्यक्ती आहेत. काही आठवड्यांपूर्वी त्यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं. पण या लढ्याला ते अत्यंत उमेदीनं सामोरे जात आहेत. आम्हाला त्यांच्यासारखा कुटुंब प्रमुख लाभला हे आमचं भाग्य आहे,' अशी पोस्ट हृतिकनं शेअर केली. 


सुनैनालाही कॅन्सर

राकेश रोशन यांनी घर घर की कहानी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर पराया धन, बुनियाद, कामचोरखुबसूरत अशा चित्रपटांमध्ये देखील काम केलं. याशिवाय कहो ना प्यार है..., कोई मिल गया, क्रिश, क्रिश ३ आणि काबिल अशा चित्रपटांचं दिग्दर्शन देखील केलं आहे. यापूर्वी राकेश रोशन यांची कन्या सुनैनाला देखील सर्व्हिकल कॅन्सरचं निदान झालं होतं. उपचारानंतर सुनैना यांनी कॅन्सरला यशस्वी मात दिली आहे.




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा