Advertisement

'अंग्रेजी मीडियम' ट्रेलरच्या आधी इरफानचा भावूक व्हिडिओ

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी इरफानचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हृतिक रोशन आणि वरुण धवन सारख्या दिग्गज कलाकारांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

'अंग्रेजी मीडियम' ट्रेलरच्या आधी इरफानचा भावूक व्हिडिओ
SHARES

बॉलिवूड अभिनेता इरफान खानचा ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाचा ट्रेलर १३ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी इरफानचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हृतिक रोशन आणि वरुण धवन सारख्या दिग्गज कलाकारांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात इरफान चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याचं आवाहन करीत आहे. तसंच आजारपणामुळे चित्रपटाचं प्रमोशन करण्यास सक्षम नाही, असं सांगत आहे.


काय बोलतोय इरफान?

इरफान खानच्या या व्हॉईस ओव्हर व्हिडीओमध्ये तुम्हाला 'अंग्रेजी मीडियम'च्या शूटिंगदरम्यान काढलेली छायाचित्रे पाहायला मिळत आहेत. तसंच व्हिडिओच्या बॅग्राऊंडला इरफान खानचा आवाज ऐकू येत आहे. व्हिडिओमध्ये इरफान म्हणतो, "हैलो भाइयों बहनों. नमस्कार. मैं इरफान खान. मैं आज आपके साथ हूं भी और नहीं भी. खैर. ये फिल्म अंग्रेजी मीडियम मेरे लिए बहुत खास है

"यकीन मानिए मेरी दिली ख्वाहिश थी कि इस फिल्म को उतने ही प्यार से प्रमोट करूं जितने प्यार से हम लोगों ने इसे बनाया है. लेकिन मेरे शरीर के भीतर कुछ अनचाहे मेहमान बैठे हुए हैं. उनसे वार्तालाप चल रहा है. देखते हैं किस करवट ऊंट बैठता है. जैसा भी होगा आपको इत्तेला कर दी जाएगी. कहावत है कि When life gives you a lemons, you make a lemonade. बोलने में अच्छा लगता है लेकिन जब सच में जिंदगी आपके हाथ में नींबू थमाती हैं ना तो शिकंजी बनाना बहुत मुश्किल हो जाता है."


माझी वाट पाहा : इरफान

इरफान म्हणतो की, आपल्याकडे सकारात्मक असण्याशिवाय इतर कोणता पर्याय आहे का? अशा परिस्थितीत आपण लिंबाचा रस बनवू शकता की नाही हे आपल्यावर अवलंबून आहे. आणि आम्ही सर्वांनी हा चित्रपट त्याच सकारात्मकतेनं बनवला आहे. आशा आहे की हा चित्रपट आपल्याला हसवेल, रडवेल आणि पुन्हा हसवेल. ट्रेलरचा आनंद घ्या. एकमेकांशी दयाळू राहा आणि चित्रपट बघा. आणि हो ..... माझी वाट पाहा."

२०१७ साली अंग्रेजी मीडियमचा पहिला भाग आला होता. त्याचं नाव हिंदी मीडियम होतं. त्यात इरफान खानसोबत पाकिस्तानी अभिनेत्री सभा क्यूमरनं काम केलं होतं. आता तिच्या जागी करीना कपूर या चित्रपटात झळकणार आहे. हेही वाचा

'कभी ईद कभी दीवाली'मध्ये सलमानखानसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री

'नागिन ४'मध्ये मौनी रॉय करू शकते एन्ट्री

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा