Advertisement

सलमान खानला सापाचा दंश, डॉक्टर म्हणाले...

या प्रकारानंतर रात्री उशिरा त्याला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं.

सलमान खानला सापाचा दंश, डॉक्टर म्हणाले...
SHARES

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) सापानं दंश केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकारानंतर रात्री उशिरा त्याला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. सलमान खान पनवेलच्या फार्म हाऊस(Salman Khan Farm House Panvel)वर असताना ही घटना घडली.

२५ डिसेंबरला पनवेलच्या फार्म हाऊसवर सलमान आपला वाढदिवस साजरा करत होता. फार्महाऊसवर सापानं दंश केल्याबरोबर त्यानं मदतीसाठी ओरड केली, फोन केला. त्यामुळे तातडीनं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सलमानला उपचारासाठी नवी मुंबईच्या कामोठेतल्या M.G.Mमध्ये नेण्यात आलं.

मित्रांसोबत वाढदिवस साजरा करताना त्याच्या लक्षात आलं, की आपल्या हाताला काहीतरी टोचतंय. त्यानं इकडे-तिकडे नजर फिरवली तेव्हा त्याला साप दिसला. सापाला पाहून सलमान खान घाबरला आणि त्यानं लगेच मदतीसाठी आरडाओरडा सुरू केली. रात्री साडे तीन वाजताच ते हॉस्पिडलमध्ये पोहोचले. सुमारे ६ ते ७ तास रुग्णालयात राहिल्यानंतर सकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

सलमान खानचं फार्म हाऊस खूप मोठं आहे, त्याच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे. त्याला याआधीही फार्म हाऊसजवळ साप दिसला होता. फार्म हाऊसच्या केअरटेकरनाही काळजी घेण्याच्या सूचना त्यानं आधी केल्या होत्या. यावेळी सुदैवानं हा साप विषारी नव्हता.

सलमान खानच्या फार्म हाऊसवर MGMच्या डॉक्टरांची टीम दाखल झाली. सकाळी सलमानला डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आता चेकअपसाठी एक टीम अर्पिता फार्म हाऊसवर दाखल झाली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा