Advertisement

म्हणून सलमानने 'लवरात्री' सिनेमाचं नाव 'लवयात्री' केलं!

सलमान रिल लाईफमध्येच नाही, तर रिअल लाईफमध्येही दबंगगिरी करण्यासाठी ओळखला जातो. पण यंदा मात्र त्याला आपल्या 'दबंगगिरी'ला थोडा आवर घालावा लागला आहे. सलमानच्या बॅनरखाली प्रदर्शित होणाऱ्या 'लवरात्री' सिनेमाच्या नावाला विरोध होत असल्याने अखेर सलमानने या सिनेमाचं नाव बदलून 'लवयात्री' असं केलं आहे.

म्हणून सलमानने 'लवरात्री' सिनेमाचं नाव 'लवयात्री' केलं!
SHARES

''एक बार मैने कमिटमेंट कर दी, तो में अपने आप की भी नही सुनता'' हा बाॅलिवूड अॅक्टर सलमान खानचा फेमस डायलाॅग तुम्हाला आठवतच असेल. सलमान रिल लाईफमध्येच नाही, तर रिअल लाईफमध्येही दबंगगिरी करण्यासाठी ओळखला जातो. पण यंदा मात्र त्याला आपल्या 'दबंगगिरी'ला थोडा आवर घालावा लागला आहे. सलमानच्या बॅनरखाली प्रदर्शित होणाऱ्या 'लवरात्री' सिनेमाच्या नावाला विरोध होत असल्याने अखेर सलमानने या सिनेमाचं नाव बदलून 'लवयात्री' असं केलं आहे.


ट्विटरवरून केली घोषणा

सलमानने सिनेमाच्या नव्या नावाची घोषणा ट्विटरवर केली. यासोबतच फोटो पोस्ट करत लिहलंय की, ‘ही स्पेलिंग मिस्टेक नाही, 'लवयात्री' चित्रपटाचे नवीन पोस्टर देखील पाहायला मिळत आहेत.




टीकेचं कारण काय?

हिंदू धर्माशी संबंधित 'नवरात्री' या सणाशी मिळतंजुळतं या सिनेमाचं नाव असल्याचं म्हटलं जात होतं. तर काही जणांकडून धार्मिक भावना दुखावल्याच्या नावाखाली सिनेमाच्या नावाला विरोध करण्यात येत होता. त्यामुळे सलमानने या सिनेमाचं नाव बदलून 'लवयात्री' असं करण्याचा निर्णय घेतला.


मेहुण्याचं पदार्पण

सलमानची बहिण अर्पिताचा नवरा आयुष शर्मा 'लवयात्री'मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमातून आयुष आणि अभिनेत्री वरिना हुसैन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. सलमानचं त्याच्या बहिणीवर किती प्रेम आहे हे काही वेगळं सांगायला नको. या प्रेमाखातरच सलमानला कोणाशीच पंगा घ्यायचा नाहीय. म्हणून काय ते नाव बदलण्याचा खटाटोप. नाहीतर सलमान आपली 'कमिटमेंट' अशी अर्धवट सोडत नाही. असो. नाव बदललं असलं तरी प्रेक्षकांना हा सिनेमा किती भुरळ घालतो हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल.



हेही वाचा-

महागुरूंच्या दिमाग में भुसा, सचिन पिळगावकर पुन्हा झाले ट्रोल

‘सविता दामोदर परांजपे’ अमेरिकेत



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा