Advertisement

महागुरूंच्या दिमाग में भुसा, सचिन पिळगावकर पुन्हा झाले ट्रोल


महागुरूंच्या दिमाग में भुसा, सचिन पिळगावकर पुन्हा झाले ट्रोल
SHARES

महागुरू सचिन पिळगांवकर अभिनय, दिग्दर्शन वा गायनाच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी आमची मुंबई- द मुंबई अँथम या गाण्यावरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या हास्याचा विषय बनलेले सचिन पिळगावकर यांना पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. 'दिमाग में भुसा' या सचिन यांनी गायलेल्या गाण्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलच झोडपलं आहे.


लाइकपेक्षा डिसलाइक जास्त

'दिमाग में भुसा, मेने उसको लुटा, आय डोन्ट केअर' असे या गाण्याचं बोल असून सचिन पिळगावकर यांनी हे गाणं गायल आहे. तीन मिनिटांच्या या गाण्यावर सध्या नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या व्हिडिओला लाइक्सपेक्षा डिसलाइकच जास्त मिळाले असून अनेकांनी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, खूप बकवास गाणं आहे, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोमवारी १७ सप्टेंबर रोजी शेमारू बाॅलीगोली या यूट्यूब अकाउंटवरून हे गाणं अपलोड करण्यात अालं आहे.


हेही वाचा -

सचिन पिळगांवकर ट्रोल, 'मुंबई अँथम' यु ट्यूबवरून गायब

अभिनयासाठी ताजमधील नोकरीला ‘तिने’ ठोकला रामराम



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा