महागुरू सचिन पिळगांवकर अभिनय, दिग्दर्शन वा गायन या माध्यमातून नेहमीच चर्चेत असतात. पण यावेळी नेटकऱ्यांनी सचिन पिळगांवकर यांना वेगळ्याच कारणाने चर्चेत ठेवलं अाहे. सचिन यांचं ‘आमची मुंबई- द मुंबई अँथम’ हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं. त्यामुळे नाईलाजाने त्यांना अवघ्या काही तासांतच हे गाणं यु ट्यूबवरून काढून टाकावं लागलं.
सबकुछ सचिन असलेलं हे गाणं सचिन यांनीच गायलं असून त्यांच्यावरच चित्रित करण्यात अालं अाहे. विशेष म्हणजे, या गाण्याचे शब्द, संगीत, चित्रीकरण विनोदी असल्यामुळे सचिन पिळगांवकर यांनी नेटकऱ्यांच्या हाती अायतं कोलीतच दिलं. १६ अाॅगस्ट रोजी शेमारू बाॅलीगोली या यु ट्यूब अकाउंटवरून हे गाणं अपलोड करण्यात अालं होतं. ५ मिनिटांच्या या व्हिडियोवर सचिन यांची खिल्ली उडवणाऱ्या शेकडो पोस्ट पडल्या. त्यात डिसलाइकची संख्या सर्वाधिक अाहे.
हे गाणं काढून यु ट्यूबवरून टाकण्यात अालं असलं तरी सचिन यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकून अापली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला अाहे. मित्राच्या मदतीसाठी मी हे गाणं तयार केलं असून त्यात माझा कोणताही स्वार्थ नाही. माझी परिस्थिती तुम्ही नक्कीच समजून घ्याल, अशी विनंती सचिन यांनी चाहत्यांना केली अाहे.
हेही वाचा-
Exclusive: अबब, ३०० किलोंची नाजूका बनली दिग्दर्शिका!
‘प्रँक’ करताना नम्रताचा उडाला थरकाप!