Advertisement

सोनू सूद गुगल ट्रेंडमध्ये अव्वल

अभिनेता सोनू सूद सध्या गुगल ट्रेंडमध्येदेखील आघाडीवर आहे. त्याने सगळ्या कलाकारांना गुगलवर मात केली आहे.

सोनू सूद गुगल ट्रेंडमध्ये अव्वल
SHARES
Advertisement

अभिनेता सोनू सूद सध्या गुगल ट्रेंडमध्येदेखील आघाडीवर आहे. त्याने सगळ्या कलाकारांना गुगलवर मात केली आहे. त्याच्याआधी गुगल ट्रेंडमध्ये अक्षयकुमार अव्वल होता. पण त्याने अक्षयलादेखील मागे टाकले आहे. मुंबई, दिल्ली यासारख्या शहरांतच नव्हे तर छोट्या शहरातील लोकदेखील सोनूविषयी गुगलवर सर्च करत आहेत.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊन काळात लाखो मजूर आपल्या घरापासून दूर परराज्यात अडकून पडले आहेत. अशा मजुरांची मूळगावी परतण्यासाठी जीवापाड धडपड सुरू आहे. त्यांना घरी पोहचविण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करतेच आहे. मात्र या कार्यात बाॅलिवूडमधील अभिनेता सोन सूद मजुरांच्या मदतीला धावून आला आहे. सोनू हजारो स्थलांतरितांसाठी बसेसची आणि जेवणाची व्यवस्था करत आहे. त्यामुळे पडद्यावर खलनायक असला तरी खऱ्या आयुष्यातला तो हिरो आहे अशा शब्दांत सर्वच स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.

सध्या गुगल ट्रे्ंडवर सध्या सोनू सूदची चलती आहे. सोनूचे मूळ गाव कोणते काय आहे, त्याने आतापर्यंत कोणकोणत्या चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्याने दिलेला टोल फ्री नंबर, तो लोकांना करत असलेली मदत अशा विविध गोष्टी लोक सध्या गुगलवर सर्च करत आहेत.हेही वाचा -

24 तासात कोरोना बाधित पोलिसांची संख्या 'इतकी' वाढली, तर 27 जणांचा मृत्यू

मुंबई महापालिकेच्या ९० सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण
संबंधित विषय
Advertisement