Advertisement

अशी सुरू झाली विराट-अनुष्काची लव्हस्टोरी!

मी अाज जो काही अाहे, तो फक्त अनुष्कामुळेच अाहे. माझ्या अायुष्यात अनुष्का अाली अाणि तिनेच मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. अापल्याकडे असलेल्या संधीचं सोनं करण्याची शिकवण तिनंच मला दिली.

अशी सुरू झाली विराट-अनुष्काची लव्हस्टोरी!
SHARES

सर्वांच्या मुखात सध्या एकच चर्चा अाहे ती म्हणजे बाॅलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा अाणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या लग्नाची. विराट-अनुष्का यांचं शुभमंगल याच अाठवड्यात होणार, अशी जोरदार चर्चा अाहे. त्यासाठी अनुष्का अापल्या संपूर्ण परिवारासह नुकतीच इटलीला रवाना झाली अाहे. 


विराट कोहलीही दिल्ली विमानतळावरून इटलीला रवाना झाला अाहे. मात्र अनुष्काच्या व्यवस्थापनानं लग्नाची ही चर्चा निव्वळ अफवा असल्याचं सांगितलं अाहे. येत्या काही दिवसांत हे दोघं लगीनबंधनात अडकतीलही. पण या दोघांची लव्हस्टोरी कशी सुरू झाली, हे तुम्हाला माहित अाहे का? तुमची उत्सुकता फारशी ताणून न धरता अाम्ही तुम्हाला या दोघांच्या प्रेमकथेची कहाणी सांगणार अाहोत.
अनुष्काच्या बाॅयफ्रेंडनंच घडवून अाणली विराटशी भेट


२०१० मध्ये रिलिज झालेल्या 'बँड बाजा बारात' या चित्रपटाअाधी रणवीर सिंह अाणि अनुष्का यांच्यात गुफ्तगू सुरू होतं. पण या दोघांनी अापल्या प्रेमाची जाहीर कबुली कधीच दिली नव्हती. 'बँड बाजा बारात'च्या रिलिजनंतर दोघांच्या नातेसंबंधात वितुष्ट अालं. मात्र रणवीरनंच अनुष्का अाणि विराटची भेट घडवून अाणली होती. त्यानंतर दोघांमधील संभाषण वाढून ते प्रत्येक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसू लागले.


अनुष्कानं विराटला मिळवून दिली जाहिरातसध्या अनेक दिग्गज ब्रँडच्या जाहिराती करणाऱ्या विराटला सुरुवातीच्या काळात अनुष्कानंच जाहिरात मिळवून दिली होती. सुरुवातीला या दोघांनी अापलं नातं सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. पण लपविण्यासारखी ही गोष्ट नव्हतीच. अखेर या दोघांनी अापल्यातील प्रेमाची कबुली दिली. 


अन् अनुष्कासाठी विराट धावून अाला!विराट कोहली जेव्हा बॅडपॅचमधून जात होता, त्यावेळी सर्वांनीच अनुष्काला ट्रोल करायला सुरुवात केली होती. पण अनुष्काच्या मदतीला विराट धावून अाला होता अाणि अापल्या दमदार खेळीनं सर्व ट्रोलर्सची बोलती बंद केली होती. 

विराटने म्हटलं की, अनुष्काला ट्रोल करणाऱ्यांनो, काहीतरी लाज राखा. अनुष्कानंच मला चांगली कामगिरी करण्याची सकारात्मक प्रेरणा दिली अाहे. 


विराटसाठी अनुष्का ठरली लेडी लक!मी अाज जो काही अाहे, तो फक्त अनुष्कामुळेच अाहे, असं विराट कोहलीनं गौरव कपूरच्या शोमध्ये म्हटलं होतं. जेव्हा मला अक्कलसुद्धा नव्हती, तेव्हा हीच लेकीलक माझ्यासाठी तारणहार ठरली. माझ्या अायुष्यात अनुष्का अाली अाणि तिनेच मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. अापल्याकडे असलेल्या संधीचं सोनं करण्याची शिकवण तिनंच मला दिली.

विराट-अनुष्काच्या लग्नाच्या बातमीची चर्चा सर्वत्र असली तरी काही दिवसांतच त्यात किती तथ्य अाहे, हे सर्वांसमोर येईल. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा