तमन्ना बनली नवाजुद्दीनची नायिका

दक्षिणेकडून हिंदीत पदार्पण केल्यानंतर अजय देवगण, अक्षय कुमार, सैफ अली खान यांच्यासोबत दिसलेली अभिनेत्री तमन्ना आता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

  • तमन्ना बनली नवाजुद्दीनची नायिका
  • तमन्ना बनली नवाजुद्दीनची नायिका
SHARE

दक्षिणेकडून हिंदीत पदार्पण केल्यानंतर अजय देवगण, अक्षय कुमार, सैफ अली खान यांच्यासोबत दिसलेली अभिनेत्री तमन्ना भाटिया आता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.


बोले चुडीया

'फोटोग्राफ' या चित्रपटात सान्या मल्होत्रासोबत दिसलेला नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या 'बोले चुडीयां' या आगामी हिंदी चित्रपटामुळे लाइमलाईटमध्ये आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. यामागील कारणंही वेगळी आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन नवाजुद्दीनचा भाऊ शामस नवाब सिद्दीकी करणार आहे. त्यामुळं नवाजुद्दीन प्रथमच आपल्या भावाच्या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. आता या चित्रपटात नवाजुद्दीनची नायिका म्हणून तमन्ना भाटियाची एंट्री झाल्याची बातमी आहे.


राजस्थानमध्ये शूटिंग 

खरं तर अगोदर या चित्रपटात नवाजुद्दीनची नायिका मौनी रॅाय बनणार होती, पण अनप्रोफेशनल वागणूकीचं कारण देत प्रोडक्शन हाऊसच्या वतीनं या चित्रपटातून मौनीला डच्चू देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मौनीच्या जागी या चित्रपटात आता तमन्नाची वर्णी लागली आहे. या चित्रपटाची निर्मिती राजेश आणि किरण भाटिया करत आहेत. नवाजुद्दीन-तमन्ना यांच्यावर चित्रीत करण्यात येणारा 'बोले चुडियां' हा रोमांस-ड्रामा आहे. लवकरच राजस्थानमध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरू करण्यात येणार आहे. 'गँग्ज आॅफ वासेपूर'मध्ये हुमा कुरेशी, 'मांझी'मध्ये राधिका आपटे, 'फ्रिकी अली'मध्ये अॅमी जॅकसन, 'हरामखोर'मध्ये श्वेता त्रिपाठीसोबत दिसलेला नवाजुद्दीन 'बोले चुडिया'मध्ये तमन्नासोबत काय धमाल करतो ते पाहूया.हेही वाचा -

Movie Review : घटनेतील कलमाआधारे जातीव्यवस्थेवर प्रहार
संबंधित विषय
ताज्या बातम्या