Advertisement

रणबीर कपूर नंतर संजय लीला भन्साळी कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

रणबीर कपूर नंतर संजय लीला भन्साळी कोरोना पॉझिटिव्ह
SHARES

अभिनेता रणबीर कपूरनंतर बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. भन्साळी सध्या मुंबईत त्यांच्या आगामी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं आहे. संजय लीला भन्साळी आणि रणबीर दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आलिया आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकानं कोरोनाची चाचणी केली आहे.”

भन्साळी यांच्या मातोश्री लीला भन्साळी यांचीही चाचणी करण्यात आली. मात्र त्या कोरोना निगेटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. तरी देखील त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं आहे.

भन्साळींना कोरोनाची लागण झाल्यानं गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता अजय देवगणनं त्यांच्यासह चित्रीकरणाला सुरुवात केली होती.



हेही वाचा

प्रेमाच्या शोधात 'गुडबॉय'

राजकारणात होणारे डावपेच लवकरच ‘खुर्ची’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा