Advertisement

रणबीर कपूर कोरोना पॉझिटिव्ह, नीतू कपूरनं केला खुलासा

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे.

रणबीर कपूर कोरोना पॉझिटिव्ह, नीतू कपूरनं केला खुलासा
SHARES

कपूर कुटुंबाच्या चिंतेत आता पुन्हा एकदा वाढ झाली आहे. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. तो सध्या क्वारंटाईन आहे. नीतू कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर यासंदर्भात माहिती दिली.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आजारी असल्याची माहिती समोर येत होती. रणबीरच्या आजारपणाबद्दलची बातमी समोर आल्यानंतर रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांनी याबद्दलची खरी माहिती दिली आहे.

त्यांनी म्हटलं, की ही गोष्ट खरी आहे, की रणबीर सध्या आजारी आहे. पण ते हे देखील म्हणाले होते की, तो पॉझिटिव्ह आहे का हे कळू शकलं नाही. पण नीतू कपूर यांनी यासंदर्भात माहिती देत खुलासा केला.  

कोरोना महामारीसोबत (Coronavirus) लढण्यासाठी लस उपलब्ध झाली आहे, मात्र कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी अजूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रणबीरलाही कोरोनाची लागण झाली आहे. पिंकविलानं दिलेल्या वृत्तानुसार, रणबीर सध्या क्वारंटाईनमध्ये असून आराम करत आहे.

आता चाहत्यांनी आलिया भट्ट आणि अयान मुखर्जीसाठीही काळजी व्यक्त केली आहे. कारण नुकतंच आलिया आणि अयान दोघंही ब्रह्मास्त्रच्या सेटवर रणबीरसोबत होते. रणबीरची आई आणि अभिनेत्री नीतू कपूरदेखील जुग जुग जियो या सिनेमाच्या सेटवरच कोरोनाच्या विळख्यात आल्या होत्या.

याच दरम्यान अभिनेता वरुण धवनही कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. वरुणशिवाय अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अर्जून कपूर, मलायका अरोरा या कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली होती.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ब्रह्मास्त्र सिनेमात एकत्र झळकणार आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. हा सिनेमा तीन भागात बनवला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.



हेही वाचा

शिवानी बावकरची ‘लग्नाची पिपाणी’

२०२१ मध्ये नेटफ्लिक्सचा धमाका, दिल्ली क्राईमसह होणार 'या' सिरिज प्रदर्शित

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा