Advertisement

रीया चक्रवर्तीची गृहमंत्री अमित शाहांकडे सीबीआय चौकशीची मागणी

गृहमंत्री अमित शाह यांना या प्रकरणात दखल देण्याची मागणी सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रीया चक्रवर्तीनं केली आहे.

रीया चक्रवर्तीची गृहमंत्री अमित शाहांकडे सीबीआय चौकशीची मागणी
SHARES

सुशांत सिंह राजपूत सुसाइड केसमध्ये सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्यांमध्ये आता अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे नावही जोडलं गेलं आहे. रियानं यासंदर्भात ट्विट केलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांना या प्रकरणात दखल देण्याची मागणी तिनं केली आहे. ट्विटमध्ये तिने स्वतःला स्पष्टपणे सुशांतची गर्लफ्रेंड असं संबोधलं आहे.

रियानं आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, आदरणीय अमित शाह सर. मी सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती. त्याच्या अकस्मात निधनाला एक महिना उलटून गेला आहे. माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे. न्यायाच्या हितासाठी मी हात जोडून या प्रकरणात सीबीआय चौकशीची विनंती करते. मला फक्त हे समजून घ्यायचे आहे की सुशांतवर असा काय दबाव होता ज्यामुळे सुशांतनं हे पाऊल उचललं.

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान पीएम मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पत्रात लिहिलेलं आहे की, मला खात्री आहे की सुशांतच्या अकाली मृत्यूबद्दल तुम्हाला माहिती असेलच. सुशांतच्या कथित आत्महत्येच्या कारणांची माहिती माझे वकील ईशकरण भंडारी यांनी घेतली आहे. मात्र, एफआयआर नंतर पोलिस अद्याप या प्रकरणाचा तपास करत आहेत. मला माझ्या सूत्रांकडून कळले आहे की दुबईच्या डॉनच्या संपर्कातील फिल्म इंडस्ट्रीचे अनेक मोठे नावं सुशांतचा मृत्यू आत्महत्या आहे हे दाखवण्यासाठी पोलिसांवर प्रेशर टाकत आहेत.

मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा की, त्यांनी सुशांतच्या खटल्याची सीबीआय चौकशी करण्यासाठी त्यांनी तयार रहावं. लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करणे आवश्यक आहे. मला विश्वास आहे की, तुमच्या सल्ल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सीबीआय चौकशीसाठी तयार असतील.



हेही वाचा

अभिनेत्री रेखा यांचा कोरोना चाचणी करण्यास नकार

सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत रिया चक्रवर्तीनं उचललं 'हे' पाऊल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा