Advertisement

'तान्हाजी'नं पार केला १०० कोटींचा डोंगर, आतापर्यंत केली 'इतकी' कमाई

रिलीजच्या सहाव्या दिवशी चित्रपटानं हा आकडा गाठल्याचं चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सांगितलं आहे.

'तान्हाजी'नं पार केला १०० कोटींचा डोंगर, आतापर्यंत केली 'इतकी' कमाई
SHARES

'तान्हाजी: द अनसंग वॉरियर'नं १०० कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या सहाव्या दिवशी चित्रपटानं हा आकडा गाठल्याचं चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे 'छपाक' पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर २३.९२ कोटींची कमाई केली.


तानाजीच अव्वल

अजय देवगणच्या 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर'नं बॉक्स ऑफिसवर १५.१० कोटी रुपयांसह दमदार सुरुवात केली होती. शनिवारी या चित्रपटाचा २०.५७ कोटी तर रविवारी २६.२६ रुपयांचा व्यवसाय झाला होता. त्यानुसार चित्रपटानं पहिल्या तीन दिवसांत ६१.७५ कोटींची कमाई केली होती. रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी १३.७५ कोटी आणि मंगळवारी १५.२८ कोटी आणि बुधवारी १६.७२ कोटी रुपये चित्रपटाची कमाई केली. यासह चित्रपटानं पहिल्या सहा दिवसांत तब्बल १०७.६८ कोटींचा व्यवसाय केला आहे.


'छपाक'ची सरासरी कामगिरी

दीपिका पदुकोणचा 'छपाक' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरासरी कामगिरी करत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी या चित्रपटानं केवळ २.५५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. चित्रपटानं पाच दिवसांत एकूण २३.९२ कोटींचा व्यवसाय केला आहे.हेही वाचा

‘तान्हाजी’ करमुक्त करा, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कार्तिक आणि साराचा 'लव आज कल'

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा