Advertisement

'गुड न्यूज' चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित

मिशन मंगल' आणि 'हॉउसफुल' या चित्रपटानंतर अक्षय कुमार 'गुड न्यूज' चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला.

'गुड न्यूज' चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित
SHARES
Advertisement

अक्षय कुमार, करीना कपूर खान, दिलजीत दोसांझ आणि किआरा आडवाणी यांचा आगामी चित्रपट 'गुड न्यूज' चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २७ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे

हा चित्रपट आयव्हीएफ टेक्नॉलॉजीने होणाऱ्या प्रेग्नंसीवर आधारित आहे. विनोदाची झालर असलेल्या या चित्रपटात अक्षय आणि करीनाने पती-पत्नीची भूमिका वठवली आहे. तर दिलजीत दोसांज आणि किआरा आडवाणी हेदेखील पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर मजेशीर असून बत्रा फॅमिलीची कहाणी यात दाखवण्यात आली आहे. आयव्हीएफ ट्रीटेमेंट सुरू असताना आडनावसारखे असल्यानं स्पर्म एक्सजेंच होतात आणि त्यानंतर घडणारा गोंधळ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे

गुड न्यूज चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोमवारी पार पडला. ट्रेलर लाँचला संपूर्ण टीम हजर होती. पण या इव्हेंटमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते करीना कपूर खाननं. लाइट यलो ड्रेसमध्ये करीना अतिशय सुंदर दिसली. सिंपल मेकअप, न्यूड लिपस्टीक आणि मोकळ्या केसांमध्ये करीना अतिशय आकर्षक दिसली. करीनानं तिचे या लूकमधील फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत


काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं पोस्टर रिलीज झाला होता. या पोस्टरमध्ये अक्षय आणि दिलजीत दोन गरोदर बायकांमध्ये मध्ये अडकलेले दिसून आले होते. यावरून प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता आता ट्रेलरवरून थोडी थंडावली आहे. धर्मा प्रोडक्शन निर्मित आणि राज मेहता दिग्दर्शित हा सिनेमा येत्या २७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
संबंधित विषय
Advertisement