'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटात अक्षय कुमार साकारणार ट्रान्सजेंडरची भूमिका

अक्षय कुमारनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्टर शेअर केलं आहे. चित्रपटात अक्षयसोबत कियारा आडवाणी देखील आहे.

  • 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटात अक्षय कुमार साकारणार ट्रान्सजेंडरची भूमिका
SHARE

अभिनेता अक्षय कुमार लवकरच एका हॉरर कॉमेडी चित्रपटात झळकणार आहे. ‘कंचना २’ या तामिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमारनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे पोस्टर शेअर केला आहे. चित्रपटात अक्षयसोबत कियारा आडवाणी देखील आहे.


 ५ जून २०२० रोजी प्रदर्शित 

चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूतानं अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. यामध्ये अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याचं बोललं जातं. राघव लॉरेन्स या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून ५ जून २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’मधील अक्षयचा लूक पाहून चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहेअक्षय कुमार ‘लक्ष्मी बॉम्ब’सोबतच ‘मिशन मंगल’, ‘हाऊसफुल ४’, ‘गुड न्यूज’ आणि ‘सूर्यवंशी’ या चित्रपटांमध्येही झळकणार आहे.हेही वाचा -

अक्षय आणि विद्याच्या 'भुलभुलैय्या' चित्रपटाचा सीक्वेल येणार

विकीच्या भावाची राधिकासोबत जमली जोडी
संबंधित विषय
ताज्या बातम्या