Advertisement

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आईचं निधन

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आई अरुणा भाटिया याचं निधन झालं.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आईचं निधन
SHARES

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आई अरुणा भाटिया याचं निधन झालं. अक्षय कुमारनं स्वत: एक ट्वीट करत ही दुःखद बातमी दिली.

मागील २ दिवसांपासून प्रकृती बिघडल्यानं अरुणा भाटिया यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर बुधवारी सकाळी अरुणा भाटिया यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्षय कुमारच्या आईच्या निधनानंतर बॉलिवूडमधूनही दु:ख व्यक्त केलं जातं आहे.

अक्षय कुमारनं आईच्या निधनानंतर एक भावूक ट्वीट केलं आहे. 'ती माझा गाभा होती आणि आज मला तिच्या जाण्याने अंतःकरणात असह्य वेदना होत आहेत. माझी आई श्रीमती अरुणा भाटिया यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे आणि ती माझ्या वडिलांकडे दुसऱ्या जगात गेली आहे. या कठीण काळात माझ्या कुटुंबासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांना आदर करतो. ओम शांती' अशा आशयाचं ट्वीट अक्षय कुमारने केलं.

अक्षय कुमारच्या या ट्वीटनंतर त्याच्या अनेक चाहत्यांसह सेलिब्रिटींनी देखील अरुणा भाटिया यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा