Advertisement

'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटातील आलियाचा जबराट लूक रिलीज

एफ हुसेन जैदी यांच्या 'माफिया क्वीन ऑफ मुंबई' या कादंबरीवरून हा चित्रपट तयार केला जात असून ही एक सत्यघटना आहे.

'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटातील आलियाचा जबराट लूक रिलीज
SHARES

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी गंगूबाई काठीयावाडीचे पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे. चित्रपटात गंगूबाईची भूमिका आलीय भट्ट साकारणार आहे. भन्साळी यांच्यासोबत आलियाचा हा पहिलाच चित्रपट आहे. एफ हुसेन जैदी यांच्या 'माफिया क्वीन ऑफ मुंबई' या कादंबरीवरून हा चित्रपट तयार केला जात असून ही एक सत्यघटना आहे.

कामाठीपुऱ्यात एकेकाळी ज्या स्त्रिचा वचक होता अश्या एका कोठेवालीची ही कथा आहे. गुजराथच्या काठियावाड प्रांतातील एका सधन घरातील ही मुलगी. १६ व्या वर्षी ती घरात काम करणाऱ्या अकाऊंटंटच्या प्रेमात पडते. तिचं स्वप्न असतं हिरोईन बनण्याचं. हा अकाऊंटंट तिला लग्नाचं वचन देऊन मुंबईत आणतो आणि ५०० रुपयात विकून टाकतो. वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेल्या या मुलीनं कोठेवाली बनून अनेक सेक्सवर्कर आणि अनाथ मुलांसाठी मोठे काम केलं. मर्जीविरुद्ध या व्यवसायात आलेल्या मुलींची तिनं सुटका केली.

माफिया करीमलाला याच्या एका चेल्यानं गंगूबाईवर रेप केला तेव्हा तिनं करीमकडे इन्साफ मागितला आणि त्यानं तिला बहिण मानलं. तेव्हा तिनं करीमला राखी बांधली. करीमशी हे नाते जुळल्यानं संपूर्ण कामाठीपुरा तिच्या ताब्यात आला होता. आलिया गंगूबाईची भूमिका कशी साकारेल? याची रसिकांना उत्सुकता लागली आहेहेही वाचा

रामदेव बाबांनी दिला दीपिका पदुकोणला 'हा' सल्ला

'तानाजी' यूपीत टॅक्स फ्री, महाराष्ट्रात कधी?

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा