Advertisement

'बेलबॉटम' नंतर 'चेहरे'देखील चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित

अमिताभ बच्चन स्टारर 'चेहरे' हा चित्रपटसुद्धा चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

'बेलबॉटम' नंतर 'चेहरे'देखील चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित
SHARES

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) स्टारर 'चेहरे' (Chehre) हा चित्रपटसुद्धा चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. २७ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित यांनी स्वतः याची घोषणा केली आहे. चित्रपट थिएटर रिलीजच्या सहा आठवड्यांनंतर ओटीटीवर येईल.

आनंद पंडित म्हणाले, "आम्ही आमचे वचन पूर्ण केले. 'चेहरे' आधी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होत आहे. आम्ही २७ ऑगस्टला येत आहोत. ज्याप्रकारे अक्षय चित्रपटगृहांमध्ये 'बेलबॉटम' घेऊन येतोय, त्याचप्रमाणे अमिताभ बच्चन साहेबांचंही म्हणणं आहे की, आपण 'चेहरे' चित्रपटगृहांमध्ये आणला पाहिजे. जर आणखी दोन किंवा तीन मोठे चित्रपटांची थिएटर रिलीज डेट जाहीर झाली तर चित्रपट चित्रपटगृहांमध्ये येण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होईल," असं पंडीत म्हणाले.

आनंद पंडित पुढे म्हणाले, "'चेहरे' हा चित्रपट आम्हाला शिक्षक दिन किंवा गांधी जयंतीसारख्या महत्त्वाच्या तारखेला आणता आला असता. पण, आम्ही ठरवलं की अक्षयचा चित्रपट १९ ऑगस्टला येत आहे. त्यानंतर पुढच्या आठवड्यात नवीन कंटेंट येण्याचे सातत्य राखायला हवे.


हेही वाचा : 

रौप्य पदक विजेती मीराबाई चानूची घेतली सलमाननं भेट, फोटोमुळे झाला ट्रोल


चित्रपटसृष्टीची उपजीविका पुन्हा सुरू होईल. चित्रपट प्रथम चित्रपटगृहात पोहोचेल. तो सहा आठवड्यांच्या अंतरानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. कोविड पुर्वी हे अंतर आठ आठवड्यांचे असायचे. विजयचा 'मास्टर' निश्चितच अपवाद होता. तो चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर दोन आठवड्यांनी ओटीटीवर आला. कदाचित तो करार आधीच झाला असावा."

आनंद पंडित म्हणाले, "'चेहरे'चं सेन्सॉर प्रमाणपत्रही आलं आहे. अमिताभ बच्चन यांची कविता देखील चित्रपटात समाविष्ट करण्यात आली आहे. बच्चन साहेबांना एक कविता खूप आवडली. त्यामुळे त्यांनी चित्रपटात फक्त त्याचा ऑडिओ बनवला. नंतर त्याचा व्हिडीओ देखील चित्रीत करण्यात आला. बच्चन साहेबांनी उणे १७ अंश सेल्सिअसमध्ये चित्रीकरण केलं. तसं थंडीचे वातावरण दिल्ली आणि मुंबईच्या स्टुडिओत तयार केलं गेलं."हेही वाचा

'या' दिवशी प्रेक्षकांना हसवायला येतोय कपिल शर्मा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा