Advertisement

वरुणच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज


वरुणच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
SHARES

आजपर्यंतच्या इतिहासात वरूण धवन जो चित्रपट स्वीकारतो तो हिट ठरतोच. अलीकडेच सलमान खानच्या जुडवाचा सीक्वलही त्याने हिट करून दाखवला. आता लवकरच वरुण कतरिनासोबत ऑनस्क्रिन रोमान्स करताना दिसणार आहे. वरूण आणि कॅटरिनाचा हा सर्वात मोठा डान्सिंग सिनेमा असणार आहे.

दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर रेमो डिसूजा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. याआधी रेमोने वरुण बरोबर एबीसीडी २ हा चित्रपट केला होता. या चित्रपटला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. पण वरुणच्या नव्या चित्रपटाच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही. तरी या चित्रपटाचं नाव एबीसीडी ३ असण्याची शक्यता आहे. रेमोने या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे.

 

आतापर्यंतचा हा सर्वात मोठा डान्स चित्रपट असल्याचा दावा रेमोने ट्रेलर रिलीज करताना केला आहे. २०१३ मध्ये डान्य इंडिया डान्स या रिअॅलिटी शोमधील डान्सरला घेऊन रेमोने एबीसीडी हा चित्रपट बनवला होता. त्यानंतर २०१५ मध्ये रेमो एबीसीडी २ घेऊन आला होता. या चित्रपटात वरूण धवन आणि श्रध्दा कपूर प्रमुख भूमिकेत होते.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा