Advertisement

'बिग बॉस १३'चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन

‘बालिका वधू’ या मालिकेतून त्याने अनेकांची मने जिंकली होती.

'बिग बॉस १३'चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन
SHARES

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या ४०व्या वर्षी सिद्धार्थनं अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनानंतर सर्वांनच धक्का बसला असून चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

सिद्धार्थचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयानं दिली आहे. . बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थनं काही औषधे घेतली होती असंही बोललं जातंय. याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती नाही. त्यानंतर रात्री त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी सिद्धार्थचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं समोर आलं.

सिद्धार्थ छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. ‘बालिका वधू’ या मालिकेतून त्यानं अनेकांची मने जिंकली होती. या मालिकेनं त्याला लोकप्रियता मिळवून दिली होती. त्याने रिअॅलिटी शो बिग बॉस १३मध्ये सहभाग घेतला होता आणि त्या सिझनचा तो विजेताही ठरला होता. त्यानंतर त्यानं 'खतरों के' खिलाडी या शोच्या सातव्या सिझनमध्येही सहभाग घेतला होता.

१२ डिसेंबर १९८० साली सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला. त्यानं एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. २००४ साली त्यानं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर २००८मध्ये त्यानं बाबुल का आंगन छूटे या मालिकेत काम केलं. पण ‘बालिका वधू’ या मालिकेनं त्याला खरी ओळख मिळवून दिली होती.



हेही वाचा

अभिनेत्री सायरा बानू आयसीयूत दाखल, श्वास घेण्यास होतोय त्रास

ड्रग्स केसमध्ये अडकला राणा दग्गुबाती, रकुलप्रीत सिंह, लवकरच होणार चौकशी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा