Advertisement

सुनील शेट्टी राहत असलेली इमारत सील, 'हे' आहे कारण

सुनील शेट्टी मागील काही वर्षांपासून ‘पृथ्वी अपार्टमेंट्स’ मध्ये राहतात. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी माना शेट्टी, त्यांची मुलगी अथिया शेट्टी आणि त्यांचा मुलगा अहान शेट्टीही याच इमारतीत राहतात.

सुनील शेट्टी राहत असलेली इमारत सील, 'हे' आहे कारण
SHARES

अभिनेता सुनील शेट्टी राहत असलेली दक्षिण मुंबईतील अल्टामाऊंट रोडवरील ‘पृथ्वी अपार्टमेंट्स’ ही इमारत सील करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आल्याने मुंबई महापालिकेनं इमारत सील केली आहे. 

एखाद्या इमारतीत पाचहून अधिक कोरोना रुग्ण आढळल्यास त्या इमारतीला मायक्रो कंटेन्मेंट झोन घोषित करून सील केले जाते. तर पाचहून कमी कोरोना रुग्ण असणाऱ्या इमारतींमध्ये केवळ रुग्ण आढळलेला मजला सील केला जातो. त्यामुळे ‘पृथ्वी अपार्टमेंट्स’ दोन दिवसांपूर्वी सील करण्यात आली आहे. 

सुनील शेट्टी किंवा त्याच्या कुटुंबीयांपैकी कोणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती पालिकेने दिली आहे. सुनील शेट्टी मागील काही वर्षांपासून ‘पृथ्वी अपार्टमेंट्स’ मध्ये राहतात. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी माना शेट्टी, त्यांची मुलगी अथिया शेट्टी आणि त्यांचा मुलगा अहान शेट्टीही याच इमारतीत राहतात. अल्टामाऊंट रोड हा मुंबईतील सर्वात पॉश परिसरांपैकी एक आहे. हा भाग जगातील सर्वात महागड्या परिसरांपैकी एक मानला जातो.’

 मुंबईत काही दिवसांपासून कोरोनाचा दैनंदिन आकडा घटला आहे. मात्र, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता महापालिकेकडून सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे.हेही वाचा -

मुंबईतील 'या' भागांत मंगळवारी पाणीपुरवठा बंद अथवा कमी दाबानं होणार

तर निवडणुकीत सत्ताधारी पक्षांवर बहिष्कार टाकू; राज्यातले व्यापारी संतापले

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा