Advertisement

नवोदित लेखक, लेखिकांसाठी आमिर खान घेऊन आलाय नवी संधी


नवोदित लेखक, लेखिकांसाठी आमिर खान घेऊन आलाय नवी संधी
SHARES

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खान नवोदित लेखक, लेखिकांसाठी नवी संधी घेऊन आला आहे. या नवीन व्यासपीठांतर्गत नव्या लेखक आणि लेखिकांना आपल्या कथा, पटकथा लिहिण्याची संधी मिळणार आहे. नवोदित लेखक आणि लेखिकांसाठी तो एक स्पर्धा घेऊन येणार आहे. 'सिनेस्तान' असं या स्पर्धेचं नाव आहे. जो ही स्पर्धा जिंकेल, त्याला आपली कथा बॉलिवूडमधल्या मोठ्या दिग्दर्शकांसमोर मांडता येणार आहेत.कसे सहभागी व्हाल स्पर्धेत?

आमिरनं आपल्या ट्वीटर अकाऊंटवर यासंदर्भातला एक व्हिडिओ शेअर केला आहे. या स्पर्धेत तुम्ही कसे सहभागी व्हाल हे आमिरनं सांगितलं आहे. या स्पर्धेसाठी लेखक आणि लेखिकांना आपल्या कथा १५ जानेवारी २०१८ पर्यंत पाठवायच्या आहेत. scriptcontest.cinestaan.com वर या स्पर्धेसाठी अर्ज करता येणार आहे.


स्पर्धेचे परिक्षक कोण?

राजकुमार हिरानी, जुही चतुर्वेदी, अंजुम राजाबली यांच्यासह आमिर खान स्वत: या स्पर्धेचा परिक्षक आहे. भाग घेतलेल्या स्पर्धकांमधूनच पाच विजेत्यांची निवड करण्यात येईल. फक्त नवोदितच नाही, तर इतर अनुभवी लेखक आणि लेखिका देखील स्पर्धेत भाग घेऊ शकतात.


विजेत्या स्पर्धकांना काय मिळणार?

विजेत्यांना ठराविक रोख रक्कम पुरस्कार म्हणून देण्यात येईल. २५ लाख रुपये विजेत्याला मिळू शकतात. शिवाय बॉलिवूडमधल्या मोठ्या दिग्दर्शकासमोर आपली कथा मांडण्याची संधीही स्पर्धेमार्फत मिळणार आहे.

जर तुम्ही चांगली कथा लिहिता किंवा तुमच्याकडे एखादी कथा असेल, तर तुम्ही या स्पर्धेत नक्कीच सहभागी व्हा. कदाचित तुमच्या कथेवर आधारित चित्रपट मोठ्या स्क्रिनवर येऊ शकतो!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement