Advertisement

शाहरुखने विकले २२ सिनेमांचे हक्क

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या चित्रपटांचे हक्क एका सॅटेलाइट वाहिनीला विकल्याचे समोर येत आहे. शाहरुखच्या एकुण २२ चित्रपटांचे हक्क विकल्याचा दावा एका वृत्त वाहिनीनं केला आहे.

शाहरुखने विकले २२ सिनेमांचे हक्क
SHARES

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या चित्रपटांचे हक्क एका सॅटेलाइट वाहिनीला विकल्याचं समोर येत आहे. शाहरुखच्या एकूण २२ चित्रपटांचे हक्क विकल्याचा दावा एका वृत्त वाहिनीनं केला आहे. मात्र, या चित्रपटांचे हक्क कितीला विकले याची माहिती अद्याप मिळालेली नसून, वाहिनीनं या चित्रपटांची खरेदी कोटींमध्ये केल्याचं समोर आलं आहे.


या चित्रपटांचे हक्क विकले

शाहरुख खानच्या 'डियर जिंदगी', 'दिलवाले', 'हॅपी न्यू इअर', 'चैन्नई एक्स्प्रेस', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'पहेली', 'बिल्लू', 'चमत्कार', 'अंजाम', 'राम जाने' या व अन्य काही चित्रपटांचे हक्क वाहिनीला विकल्याचं समोर आलं आहे. 


चित्रपटांचा टीआरपी चांगला

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार शाहरुखच्या या चित्रपटांचा टीआरपी चांगला असल्यानं त्या चित्रपटांना योग्य किंमत मिळाली आहे. बॉलिवूडमधील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार असल्याचं म्हटलं जातं आहे.हेही वाचा -

खूशखबर! रेल्वे अवघ्या ४९ पैशांत प्रवाशांना देणार १० लाखांचा विमा

मुंबईत महिलांसाठी केवळ ३ हजार सार्वजनिक शौचालयंसंबंधित विषय
Advertisement